शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिरांसाठी उच्च शिक्षणाची सुविधाच नाही

By admin | Updated: January 14, 2015 23:35 IST

केवळ बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा, शासकीय नोकर भरतीत अडचणी.

सचिन राऊत /अकोला: सरकारी नोकर्‍यांसाठी भरती प्रक्रिया राबविताना मूकबधिरांसाठी राखीव जागा असतात. या पदांसाठी उच्च शिक्षणाची गरज असली तरी, प्रत्यक्षात मूकबधिरांसाठी राज्यात उच्च शिक्षणाची सुविधाच उपलब्ध नाही. राज्यात मूकबधिरांच्या ३५0 अनुदानित शाळा असून, ३ शासकीय शाळा आहेत; मात्र या ठिकाणी केवळ बारावीपर्यंतच शिक्षणाची सुविधा असल्याने मूकबधिरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.राज्यात शासकीय नोकरभरती राबविताना मूकबधिरांसाठी राखीव जागा ठेवण्यात येतात. या जागा भरताना मूकबधिरांना बी.ए., बी.कॉम., बी.एसस्सी. यासारख्या शिक्षणाची अट घालण्यात येते; मात्र मूकबधिरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यात एकही महाविद्यालय नाही. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित राज्यात ३५0 शाळा असून, या शाळांमध्ये केवळ बारावीपर्यंंत शिक्षणाची सुविधा आहे. यासोबतच अकोला, लातूर व औरंगाबाद येथे शासकीय मूकबधिर विद्यालय असून, या ठिकाणीही उच्च शिक्षणाची सुविधा नाही. एकीकडे शासकीय सेवेत घेण्यासाठी उच्च शिक्षणाची अट घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कुठलीही सुविधा नसल्याचे चित्र दिसत आहे. मूकबधिरांसाठी केवळ बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे शासकीय सेवेत लागण्यासाठी मूकबधिरांना अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यात अनेक ठिकाणी बोगस मूकबधिरांनी शासकीय नोकर्‍यांवर डल्ला मारला असून, याची तपासणी करण्याची मागणी राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पटवारी यांनी केली आहे. *द्विभाषकाची हवी नेमणूकमूकबधिरांना शिक्षण देताना सांकेतिक द्विभाषकाची (साईन लँग्वेज) नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपंगांमुळे मूकबधिरांना अनेक ठिकाणी डावलण्यात येत असून, हा प्रकार टाळण्यासाठी मूकबधिरांना द्विभाषकांद्वारे शिक्षण देण्याची मागणी होत आहे.