शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अर्थसंकल्पात कृषीसाठी ठोस तरतूदच नाही!

By admin | Updated: March 15, 2016 02:14 IST

कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांचे प्रतिपादन.

दादाराव गायकवाड / कारंजा लाड (जि. वाशिम)भारत हा कृषिप्रधान देश आहे; परंतु या देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पात कृषी विकासासाठी ठोस अशी तरतूदच करण्यात येत नाही, असे मत शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी लोकमतशी संवाद साधताना व्यक्त केले. युवा शेतकरी परिषदेच्या निमित्ताने विजय जावंधिया कारंजा येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी कृषी अर्थशास्त्र आणि सरकारचे धोरण या विषयावर संवाद साधला.प्रश्न: शेतकर्‍यांना कृषी मालाचे योग्य भाव मिळण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे काय? -शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी बाजार व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप असायलाच हवा; तसेच शासनाने शेतकर्‍यांना कृषी मालावर सबसिडीच्या माध्यमातून मदत करायला हवी.प्रश्न: शेतकर्‍यांना स्वत:च्या मालाचे भाव निश्‍चित करण्याचा अधिकार असायला हवा काय?-या जगात प्रत्येक व्यापार्‍याला किंवा विक्रेत्याला जर त्याच्या वस्तूचे किंवा मालाचे भाव स्वत: निश्‍चित करण्याच्या अधिकार असेल, तर शेतकर्‍यांनाही त्याच्या मालाचे भाव निश्‍चित करण्याचा अधिकार असायलाच हवा.प्रश्न: सवरेदयची विचारधारा आधुनिक युगात कितपत लागू पडते? -भूदान चळवळीला गावागावापर्यंत घेऊन जावे लागेल. कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी लागेल. भूदानचे महत्त्व, त्याचे फायदे गावकर्‍यांना समजावून सांगावे लागतील. भूदान चळवळीचे महत्त्व नव्या पिढीला आधुनिक युगात कसे महत्त्वाचे आहे, हे सांगावे लागेल. प्रश्न: सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आणि उद्योगधाजिर्ने आहे काय?-होय, भारताच्या विद्यमान सरकारचे धोरण हे शेतकर्‍यांच्या विरोधात असून, हे सरकार उद्योगधजिर्णे असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. प्रश्न: मानोरा तालुक्यातील जामदराच्या शेतकर्‍यांनी खरीप हंगामावर बहिष्कार टाकला. याबाबत काय म्हणाल?शेतकर्‍यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलनाचा हा प्रकार निश्‍चित चांगला असून, जामदराच्या शेतकर्‍यांचे यासाठी मी सर्मथन करतो. प्रश्न: शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो, शेतकर्‍यांना नाही, सरकारच्या या दाव्यात तथ्य आहे काय?-सरकारचा हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही. मनमोहनसिंग सरकारने शेतकर्‍यांना २ हजार कोटींची कर्ज माफी दिली होती. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांना फायदा झाला होता. प्रश्न: विजय मल्ल्यांनी काँग्रेसच्या काळात कर्ज घेतल्याच्या सरकारच्या युक्तिवादाबाबत काय म्हणाल?-विजय मल्ल्या यांनी काँग्रेसच्या काळात कर्ज घेतले असले तरी, त्यांनी पलायन भाजप सरकारच्या काळात केले आहे. त्यांनी मल्ल्यांना पलायन कसे करू दिले, याचे उत्तर प्रथम द्यावे.