शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डांबरी रस्त्यासाठी फक्त दोन निविदा

By admin | Updated: July 4, 2014 00:43 IST

१५ कोटींच्या निविदा प्रक्रियेकडे कंत्राटदारांची पाठ

अकोला : अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांसाठी शासनाकडून मनपाला १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. या निधीतून १८ रस्त्यांपैकी ७ रस्ते सिमेंट काँक्रिटचे व उर्वरित डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असता, डांबरीकरणाच्या आठ कामांसाठी प्राप्त झालेल्या फक्त दोन निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या. उर्वरित सिमेंट रस्त्यांसाठी कंत्राटदारांनी निविदाच सादर केली नसल्याचे समोर आले. रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. या निधीतून शहरातील प्रमुख १८ रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार असून, यामध्ये ७ रस्ते सिमेंट काँक्रिटचे, तर उर्वरित डांबरीकरणाचे होतील. याकरिता प्रशासनाने ई-निविदा जारी केली. ३0 जूनपर्यंत ह्यऑन लाईनह्णअर्ज सादर करण्याची मुदत होती. गुरुवारी बांधकाम विभागाने निविदा उघडल्या असता, केवळ दोन कंत्राटदारांनी डांबरीकरणाच्या आठ कामांसाठी निविदा सादर केल्याचे समोर आले. प्रशासनाने निविदा प्रक्रियेत जाचक अटींचा समावेश केल्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी कंत्राटदारांनी निविदाच सादर केली नसल्याची माहिती आहे. शिवाय डांबरीकरणासाठीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत डांबर रस्त्यांची कामे करणार्‍या व ह्यहॉट मिक्स प्लान्टह्ण असणार्‍या बड्या कंत्राटदारांनीच निविदा अर्ज सादर केले.