शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या सावटाखालीही त्यांची सेवा सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:43 IST

या तुंबलेल्या नाल्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही ते साफ करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कुणीही बाहेर निघू नका, घरीच थांबा, हा सरकारने आदेश दिला आहे. त्यासाठी राज्यात संचारबंदीही लागू केली आहे; मात्र काही सेवा अशा आहेत की त्या कधीच थांबत नाहीत. एरव्ही कायदा व सुव्यवस्थेसाठी लावल्या जाणाऱ्या संचारबंदीत काम करताना या सेवा क्षेत्रातील लोकांना जगण्याची धास्ती नसते; मात्र आता थेट जीवाशीच खेळ असलेल्या कोरोनाशी लढाई आहे; मात्र अशा लढाईतही जीवावर उदार होऊन एक घटक राबतो आहे, रस्त्यावरच्या घाणीत.., कचºयात.., गल्लीबोळात! होय, तोच तो ‘सफाई कामगार’!घरात बसून स्वच्छतेची काळजी करणाऱ्यांजवळ सॅनिटायझर आहे. मास्क आहेत. दिवसातून पंधरा वेळा हात धुण्यासाठी नळ आहेत; मात्र लोकांच्या स्वच्छतेची काळजी वाहणारे सफाई कामगार तोंडावर मास्क चढवून आणि हातात ग्लोव्हज घालून गल्लीबोळातील कचरा स्वच्छ करीत आहेत.रस्त्यावर फेकलेले मास्क, पाऊच, पालापाचोळा आणि रस्त्यावरून धावणाºया अगणित माणसांच्या पायाला चिकटलेले कचºयातील जीवजंतूही ते उचलत आहेत. आम्ही घरात बसून चकचकीत आंघोळ करतो, साबण वापरून भांडी घासतो.घरातील वापराचे पाणी पाइपमधून नालीत सोडतो. या तुंबलेल्या नाल्या कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणातही ते साफ करीत आहेत.

यांचा प्राधान्याने विचार करा...स्वत:चा जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करणाºया या सफाई कामगारांना आम्ही काय देतो, कधी बोलतो आपण मोकळेपणे त्यांच्याशी, उच्चभ्रूपणाची झूल पांघरणारे आम्ही त्यांचा कधी विचारही करीत नाही. त्यांच्याशी आम्ही कधी प्रेमाने बोलत नाही. घरासमोरची नाली साफ करणाºयांना कधी चहासाठीही विचारत नाही, प्रकृतीची चौकशी करणे तर दूरच राहिले! यांच्याशी समाज तुसडेपणाने वागूनही ते मात्र निष्ठेने सेवा करतात. कोरोनाच्या निमित्ताने सारे जग घरात बंदिस्त झाले असताना त्यांच्या सुरू असलेल्या सेवेचे मोल कसे करणार, किमान त्यांच्याशी आदरपूर्वक वागले तरी खूप आहे, तेवढे तरी कराल ना?

टॅग्स :Akolaअकोला