शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पातुरात चोरी; सात लाख रुपयांचा ऐवज लंपास

By admin | Updated: March 24, 2017 02:18 IST

पातूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

पातूर (अकोला), दि. २३- पातूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. येथील बालाजी वेटाळातील रहिवासी शिक्षकाच्या बंद घरात १७ ते २२ मार्चदरम्यान घरावरील टिनपत्रा कापून सोने-चांदी व रोख रक्कम अशी सात लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी करण्यात आली. ही बाब २२ मार्चच्या रात्री उघडकीस आली. मागील दोन महिन्यांत शहरात चोरीच्या ८ ते १0 घटना घरे किंवा दुकानांची टिनपत्रे कापूनच घडल्या आहेत. त्यामुळे पातुरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पातुरातील अगदी मध्यवर्ती भागातील कालिकामाता मंदिराजवळील बालाजी वेटाळात राहणारे फिर्यादी विनायक सखाराम मुळे हे सेवानवृत्त शिक्षक १७ मार्च रोजी संपूर्ण कुटुंबासह कामानिमित्त नाशिकला गेले होते. ते २२ मार्चच्या रात्री १0 वाजता घरी आले असता, त्यांना दाराचे कुलूप तोडल्याचे व घरावरील टिन अज्ञात चोरट्यांनी कापले असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी घरातील सामानाची तपासणी केली असता, घरातील २३0 ग्रॅम सोने, ३८0 ग्रॅम चांदीची भांडी व रोख ९५ हजार रुपये असा एकूण सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची बाब लक्षात आली. या चोरीमध्ये ५0 ग्रॅमची सोन्याची पूजेची महालक्ष्मीची मूर्ती, ७0 ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टाप्स, सात ग्रॅमचे सोन्याचे महालक्ष्मीचे दोन नग, गळ्यातील मंगळसूत्र असा २३0 ग्रॅम सोन्याचा ऐवज, १0 ग्रॅमचे चांदीचे २६ नाणे, २0 ग्रॅमची चांदीची एक नग कुचरी, प्रत्येकी ५0 ग्रॅम वजनाचे चांदीचे महालक्ष्मीसमोरील दोन नग प्याले अशी ३८0 ग्रॅम चांदीची भांडी तसेच रोख ९५ हजार रुपये असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्ती पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.