शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

पारस येथे चोरीचे सत्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:19 IST

पारस : येथील एकतानगरस्थित देशी दारू दुकानातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीची शाई वाळत नाही, तोच येथील अत्यंत रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकानांसह विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी २५ जुलैच्या मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देदोन दुकाने फोडली: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपारस : येथील एकतानगरस्थित देशी दारू दुकानातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीची शाई वाळत नाही, तोच येथील अत्यंत रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकानांसह विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी २५ जुलैच्या मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केला. एकाच दिवशी झालेल्या तीन चोºयांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील टी-पॉइंट चौकात असलेल्या ग्रामीण बँकेत २५ जुलैच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला व चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न केला; परंतु, त्यांना तिजोरी फोडता आली नाही. त्यानंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या पारस कॉर्नर या दुकानात प्रवेश करून २,४९० रुपये लंपास केले. पुढे चोरट्यांनी आपला मोर्चा रेल्वे स्टेशन चौकात असलेल्या यादव मार्ट या दुकानाकडे वळविला. तेथे सुद्धा दुकानाचे दोन्ही शटर वाकवून दोन हजार रुपये नगदी लंपास केले. अलीकडच्या काळात पारस व परिसरात चोºयांचे प्रमाण खूप वाढले आहे. महिलांचे गळ्यातील मंगळसूत्र पळविणे, बकºया चोरणे, मोबाइल लंपास करणे यासारखे प्रकार वाढीस लागले आहेत. यासाठी पोलिसांची संख्या वाढणे गरजेचे झाले आहे.अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!ग्रामीण बँकेमध्ये सुरक्षिततेच्या कोणत्याच सुविधा नसल्याने अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सीसी कॅमेरा, सुरक्षा गार्ड वा अलार्म अशी कुठलीच व्यवस्था येथे नाही. बँकेचे जनरल मॅनेजर खाडे यांना याबाबत विचारले असता, लवकरच व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारणअकोला येथील श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनेचे वृत्त समजताच ठाणेदार मिर्झा यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या. याप्रसंगी गावचे पोलीस पाटील गजाननराव दांदळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय शेळके यांनीही भेट दिली. यावेळी ग्रामस्थांची तोबा गर्दी जमली होती.चोरीची पद्धत सारखीदुकानास तसेच बँकेस असलेल्या कुलपांना हात न लावता जॅकचे सहाय्याने शटर उघडून चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये दुकानाच्या शटरचे खूप नुकसान झाले. शटर अक्षरश: वाकले.ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी नहूश सुधीर फडके यांचे फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४६१, ३८०, ५११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय संजय सिरसाठ करीत आहेत.