शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची हत्या पूर्ववैमानस्यातूनच! पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By नितिन गव्हाळे | Updated: October 31, 2022 14:14 IST

अकोट फैल पोलिसांनी कारंजातून आवळल्या आरोपींच्या मुसक्या

अकोला: शिवसेना(उद्धव ठाकरे) गटाचे अकोला उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले(२६) यांची जठारपेठ चौकात धारधार चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांसह रामदासपेठ पोलिसांनी रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास दोन आरोपींना अटक केली.

जिल्ह्यात गत आठवडाभरापासून प्राणघातक हल्ल्यासह, हत्येसारख्या घटना घडत आहेत. एकामागोमाग घडलेल्या तीन हत्यांनी शहर हादरले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास जठारपेठ चौकात शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर चार ते पाच हल्लेखारांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल कपले यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी विशाल कपले यास मृतक घोषित केले. या आरोपींनी विशालवर लगातार सात वार केल्याने विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही हत्या करणाऱ्यांमध्ये दोघे आरोपी कारंजात असल्याची माहिती रामदासपेठचे ठाणेदार किशोर शेळके यांच्यासह अकोट फैलचे पोलीस निरीक्षक नितीन सुशीर, पोलीस कर्मचारी दीप तराळे, छोटू पवार, प्रशांत इंगळे यांना मिळाली.

त्यांनी तातडीने कारंजा गाठून आरोपींना ताब्यात घेतले. या हत्ये प्रकरणी विविध कयास लावले जात असतानाच दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर(२३) व विनोद रमेश कांबळे(२२) दोघेही रा. महाकाली मंदिराजवळ मोठी उमरी यांनी विशालची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रामदासपेठचे ठाणेदार किशोर शेळके तपास करीत आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना