शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या आला रे आला...शेत शिवार झाले रिकामे! खिरपुरी खुर्द, व्याळा परिसरात शेतमजूर शेतात जाईना

By रवी दामोदर | Updated: September 18, 2023 19:57 IST

मशागतीचे कामे थांबली, शेतकरी अडचणीत; खिरपूरी खुर्द परिसरातील खैराटी भागात एका वन्य प्राण्याची शिकार झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अकोला : गत दहा दिवसांपूर्वी वाशिम मार्गावरील नवीन हिंगणा परिसरातील बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. हल्ला करून पसार झालेला बिबट त्याच परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. परंतू खिरपुरी खूर्द, खिरपूरी बु., व्याळा, बारलिंगा, हिंगणा परिसरात बिबट्या दिसल्याच्या चर्चेना उधाण आले आहे. परिणामी शेतशिवार रिकामे झाले असून, शेतमजूरही शेतात जाण्यासाठी भीत आहे. सध्या परिसरातील मशागतीचे कामे ठप्प पडली असून, शेतकरी अडचणीत आले आहेत.

      खिरपूरी खुर्द परिसरातील खैराटी भागात एका वन्य प्राण्याची शिकार झाल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे परिसरात भीती वाढली असून, शेतमजुर घरीच राहत आहेत. सध्या फवारणी, निंदणाची कामे सुरू असतात. परंतू परिसरात बिबट असल्याने शेतमजुरांमध्ये धास्ती आहे. फवारणी वेळेत होत नसल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. शेतमजूर शेतात जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. बिबट्याला तत्काळ पकडून भीती मुक्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.खिरपुरी बु. व खिरपुरी खुर्द परिसरात बिबट्याची दशहत असून, शेतीचे कामे ठप्प झाली आहेत. शेतमजूर शेतात जात नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ बिबट्याला पकडून जनतेला भीतीमुक्त करावे.

- रवी रमेश दांदळे, सरपंच, खिरपुरी बु.

वन विभागाचे पथकाने खिरपुरी, व्याळा, बारलिंगा परिसरात शोध मोहिम राबविली आहे. पिंजरे व ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी.- सुरेश वडोदे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग अकोला.