शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक; १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर

By संतोष येलकर | Updated: April 5, 2024 18:16 IST

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत (४ एप्रिलपर्यंत) २८ उमेदवारांकडून ४० अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते.

संतोष येलकरअकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २८ उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवार ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ११ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर आले असून, १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर आले.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत (४ एप्रिलपर्यंत) २८ उमेदवारांकडून ४० अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते. संबंधित उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया ५ एप्रिल रोजी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आली. छाननीत २८ पैकी ११ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले असून, १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, निवडणूक निरीक्षक (सामान्य) रामप्रतापसिंग जाडोन, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.अर्ज नामंजूर करण्यात आलेले असे आहेत ११ उमेदवार !

छाननी प्रक्रियेत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी), अरूण भागवत (अपक्ष), पूजा शर्मा (अपक्ष), सचिन शर्मा (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), महेंद्र मिश्रा (अपक्ष), अंबादास दांदळे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष), ॲड. रामभाऊ खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष), शेख मजहर शेख इलियास (अपक्ष) यांचा समावेश आहे.अर्ज मंजूर करण्यात आलेले असे आहेत १७ उमेदवार !

छाननीत १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी), अॅड.प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), डाॅ.अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस), मुरलीधर पवार (अपक्ष), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र कोठारी (अपक्ष), अशोक थोरात (अपक्ष), रत्नदीप गणोजे (अपक्ष), काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग), प्रीती सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), नारायणराव गव्हाणकर (अपक्ष), रविकांत अढाऊ (जय विदर्भ पार्टी),दिलीप म्हैसने (अपक्ष) गजानन दोड (अपक्ष), ॲड. उज्ज्वला राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांचा समावेश आहे.