शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराचा रायटर २७ हजारांची लाच घेताना गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

अकोला एसीबीची रामदासपेठ पोलीस ठाण्यात कारवाई अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विविध ठिकाणावर देशी व विदेशी ...

अकोला एसीबीची रामदासपेठ पोलीस ठाण्यात कारवाई

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विविध ठिकाणावर देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या होम डिलिव्हरी करणारा ऑटो पकडल्यानंतर तो ऑटो सोडून देण्यासाठी तसेच त्यानंतर हा व्यवसाय करू देण्यासाठी सुमारे २७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रामदासपेठ पोलीस ठाण्यातील ठाणेदाराचा रायटर गणेश पाटील यास गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

रामदास पेठ पोलीस पोलिसांनी दारूची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करणारा ऑटो पकडला. त्यानंतर ऑटोसहित दारूचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ऑटो चालक, ऑटो व मुद्देमाल सोडून देण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांचा रायटर असलेला गणेश रामराव पाटील याने २७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, चालकास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २७ हजार रुपयांची लाच घेताना गणेश पाटील यास रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या लाचखोरी प्रकरणात अकोला एसीबीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका रायटरने सुमारे २७ हजार रुपयांची लाच मागणे ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याचाही शोध आता अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केला आहे.