शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जुगाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी ठाणे हजेरीचा उतारा

By admin | Updated: April 27, 2017 01:29 IST

एमआयडीसी पोलिसांचा फंडा, वरली व जुगारावर नियंत्रण

सचिन राऊत - अकोलाजिल्ह्यात जुगार आणि वरली अड्ड्यांना ऊत आला असून, यावर पोलीस कारवाईही करण्यात येते; मात्र ठोस कारवाई होत नसल्याने जुगारींचे हे धंदे पुन्हा फोफावत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रणासाठी एमआयडीसी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवित जुगार आणि वरली अड्डे चालविणाऱ्यांना दिवसातून सकाळ आणि सायंकाळ असे सहा तास ठाण्यात बसवून ठेवण्याचा फंडा सुरू केला आहे, त्यामुळे जुगारींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.जुगार आणि वरली अड्ड्यावर संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार कारवाई करण्यात येते; मात्र पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडूनही छापेमारी करीत कारवाई करण्यात येत आहे; मात्र ठोस कारवाईसाठी पोलिसांचे हात बांधले असल्याने हे जुगारी त्याचक्षणी जामिनावर सुटून हा जुगार आणि वरली अड्ड्यांचा धंदा जोमाने सुरू करतात. पोलीस कारवाईला न जुमानता जुगारी आणि वरली अड्डे चालविण्याचा हा धंदा बंद करण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जुगारींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी संशयित आणि कारवाई करण्यात आलेल्या जुगारींची एक यादी तयार केली. त्यानंतर या जुगारींना रोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीस तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येत आहे. वरलीचे आकडे काढण्यात येतात, त्याच वेळेत या जुगारींवर करडी नजर ठेवून पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येत असल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार अड्डे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.दररोज सहा तास ठाण मांडूनवरली आणि जुगार अड्डे चालविणाऱ्यांना रोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास अशाप्रकारे दिवसातून सहा तास ठाण्यात बसवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा हा अड्डा चालविण्याचा प्रकार फसत असल्याची माहिती आहे.इतर पोलीस स्टेशननेही राबवावा उपक्रमएमआयडीसी पोलिसांनी जुगारींचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू केलेला बंदोबस्त शहरासह जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमध्येही राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.जुगारींवर कारवाई केल्यानंतरही त्यांचे अड्डे दुसऱ्याच दिवशी चालू करण्यात येत होते. त्यामुळे पोलीस कारवाईचा त्यांना धाक उरला नव्हता; मात्र या जुगारींचा नेहमीचा बंदोबस्त करण्यासाठी हा फंडा सुरू केला आहे.- किशोर शेळके, ठाणेदार, एमआयडीसी, पोलीस, स्टेशन.--