शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

बनावट सोने; व्यापाऱ्यास २.५० लाखांचा गंडा!

By admin | Updated: July 14, 2017 01:26 IST

अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भांडे व्यापाऱ्याला नकली सोने देऊन अडीच लाख रुपयांनी गंडविल्या गेल्याची घटना १२ जुलै रोजी टॉवर चौकामध्ये घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भांडे व्यापाऱ्याला नकली सोने देऊन अडीच लाख रुपयांनी गंडविल्या गेल्याची घटना १२ जुलै रोजी टॉवर चौकामध्ये घडली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील भांडे व्यापारी नारायण साबू यांना एका भामट्याने केवळ अडीच लाख रुपयांमध्ये दोन किलो सोने देण्याचे आमिष दिले. सदर व्यापारी भामट्याच्या आमिषाला बळी पडत त्याने अडीच लाख रुपये देऊन सोने खरेदीचा सौदा पक्का केला. त्यानुसार १२ जुलै रोजी टॉवर चौकात सदर व्यापारी अडीच लाख रुपये घेऊन आला.व्यापाऱ्याने अडीच लाख रुपये देताच या भामट्याने बनावट सोने त्यांच्या हातात ठेवून पळ काढला. सदर भामट्याने या व्यापाऱ्यास मला सोन्याची वस्तू काम करीत असताना सापडली आहे. ती मला तुम्ही विकून द्या, अशी विनवणी केली. त्यानुसार व्यापाऱ्याने ते सोने घेऊन सोनाराकडे चाचपणी केली असता ते सोने नसून पितळ असल्याचे समोर आले. फसविणारा व्यक्ती याआधी दोन-तीन वेळा दुकानावर भांडे घेण्यासाठी आल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले आहे. व्यापाऱ्याला स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने रामदासपेठ पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नकली सोने देऊन अडीच लाख रुपये घेऊन पोबारा करणाऱ्या व्यक्तीचे नाव रमेश दलपत असून, तो राजस्थानमधील रहिवासी असल्याचे फसवणूक झालेला व्यापारी पोलिसांना सांगत आहे.