शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपाकडे शेतक-यांची पाठ

By admin | Updated: June 10, 2016 02:05 IST

अकोला परिमंडळातील पात्र १६३४ लाभार्थींपैकी २१२ जणांनी भरले ‘कोटेशन’

अतुल जयस्वाल / अकोला केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत महावितरणच्या सहकार्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत असली तरी या योजनेचा लाभ घेण्याबाबत शेतकरी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत पात्र ठरलेल्या महावितरणच्या अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमधील १६३४ लाभार्थींपैकी केवळ २१२ जणांनीच सौर कृषिपंपासाठी लाभार्थी हिश्श्याची रक्कम जमा करून कोटेशन भरल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर शाश्‍वत तोडगा म्हणून शेतकर्‍यांना अनुदानावर सौर कृषिपंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकर्‍यांना ७.५ अश्‍वशक्तीपासून ते ३ अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर ऊज्रेवर चालणारा कृषिपंप देण्यात येतो. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्‍याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. उर्वरित ६0 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. तीन जिल्ह्यांतील सद्य:स्थितीजिल्हा            पात्र लाभार्थी              कोटेशन भरलेले लाभार्थीअकोला                   ९३५                     ५५बुलडाणा                  ३८५                   १२५वाशिम                    ३१४                     ३२--------------------------------------------------एकूण                    १६३४                   २१२