शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी थेट प्रदेश पातळीवरून चाचपणी

By admin | Updated: August 26, 2014 22:01 IST

अकोला पश्‍चिम मतदारसंघ: इच्छुकांमध्ये रस्सीखेच

अकोला : विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी कॉंग्रेस इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघातून सक्षम उमेदवारासाठी थेट प्रदेशपातळीवरून चाचपणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदेश पातळीवरील एका मोठय़ा नेत्याच्या खासगी सहाय्यकाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करून माहितीही संकलित केली आहे. उमेदवारीसाठी कोणत्या समाजाचे किती मते आहेत, याचाही आढावा घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसमधील दिग्गज इच्छुकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली. जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी इच्छुकांनी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाकडून अर्जही घेतले होते. जिल्ह्यातून एकूण ७२ इच्छुकांचे अर्ज प्रदेश कार्यालयात पाठविण्यात आले. सर्वात जास्त १८ अर्ज अकोला पश्‍चिम मतदारसंघातील इच्छुकांचे पाठविण्यात आले. जिल्ह्यात उमेदवारीसाठी सर्वात जास्त रस्सीखेच अकोला पश्‍चिम मतदारसंघात सुरू आहे. उमेदवारीवरून पक्षात ह्यपॅनलह्णबाजीही सुरू आहे. या पॅनलचे सदस्य पॅनलमधील कोणालाही उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करीत आहेत. दरम्यान, अकोला पश्‍चिम मतदारसंघासाठी आता थेट प्रदेश पातळीवरील मोठय़ा नेत्याकडून चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या नेत्याच्या खासगी सहाय्याने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याची भेटही घेतली. स्वीय सहाय्यकाने इच्छुक असलेल्या एका डॉक्टरबाबतही माहिती संकलित केल्याचे समजते.