लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे एका प्रार्थनास्थळासमोरुन जाणाऱ्या लग्नाच्या वरातीमधील वाद्य वाजविण्याच्या वादातून दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत सहा जण जखमी झाले असून ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी दहा जणांना अटक केली आहे.प्रार्थनास्थळासमोरुन जाणाऱ्या लग्नाच्या वरातीमध्ये डिजे वाजविला जात होता. याला काही लोकांनी आक्षेप घेतला. यामुळे तणाव वाढला व दगडफेकीला सुरुवात झाली. या दगडफेकीत सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये वर पित्याचा समावेश आहे. तीन जखमींना शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
लोहारा येथे तणाव!
By admin | Updated: May 17, 2017 01:07 IST