शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी रुपये

By admin | Updated: December 2, 2014 23:43 IST

राज्यातील १ हजार ७४१ गावे पुरस्कारासाठी पात्र.

डॉ. किरण वाघमारे/अकोलामहात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत सहभागी होऊन आपले गाव तंटामुक्त करणार्‍या ग्रामपंचायतींना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावांना ४६ कोटी रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम गत सहा वर्षांपासून सुरु आहे. २00८ साली तंटामुक्त गाव मोहिम अभियानाला सुरुवात झाली. १५ ऑगस्ट २0१३ पासून सुरु झालेले या मोहिमेचे सहावे वर्ष १५ ऑगस्ट २0१४ रोजी संपले. या वर्षात राज्यातील अनेक गावांनी मोहिमेत सहभाग घेतला. ग्रामसभा घेवून या गावांनी आपला मोहिमेतील सहभाग निश्‍चित केला. मोहिमेतील तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि गावातील दाखल केलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्यांची माहिती ३0 सप्टेंबर २0१२ पर्यंत संकलीत करावयाची होती. या सर्व बाबींची पुर्तता योग्य पद्धतीने करणार्‍या गावांना तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. १४ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार तंटामुक्त गावांचे निकष स्वंयमूल्यमापनानुसार पूर्ण करणार्‍या गावांचा तंटामुक्त पुरस्काराच्या पुढील टप्प्यासाठी निवड झाली. १ मे २0१३ रोजी ग्रामसभा घेवून गाव तंटामुक्त झाल्याची घोषणा करणार्‍या गावांचे ५ मे ते ५ जून २0१३ या कालावधीत जिल्ह्यातंर्गत मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात २ हजार १३६ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. २0 जून ते २0 जुलै २0१३ या कालावधीत या गावांचे जिल्हाबाह्य मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन करणार्‍या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये ४७ गावे ही २00 पैकी १९0 व त्यापेक्षा अधिक गुण घेवून शांतता पुरस्कारासाठी पात्र झाली आहेत. २00१ च्या जनगणनेच्या निकषानुसार या गावांना लोकसंख्येप्रमाणे ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी करता येणार आहे.