शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा

By admin | Updated: April 11, 2017 01:38 IST

स्वाइन फ्लूचे सावट; महापौरांचे प्रशासनाला निर्देश

अकोला: डुकरांच्या माध्यमातून मानवी शरीरावर हल्लाबोल करणार्‍या एच-१, एन-१ या विषाणूंपासून स्वाइन फ्लू होत असल्यामुळे शहरातील मोकाट डुकरांना पकडण्यासाठी निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. वराहपालन करणार्‍यांनी आडकाठी निर्माण केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी दाखल करण्याची महापौरांची स्पष्ट सूचना आहे. प्रशासन महापौरांची सूचना कितपत गांभीर्याने घेते, हे लवकरच दिसून येणार आहे. स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरणार्‍या एच-१, एन-१ या विषाणूंचे डुकरांच्या माध्यमातून संक्रमण होते. डुकरांना या विषाणूचा वाहक मानल्या जाते. या आजारासाठी थंडीचे दिवस पोषक मानले जात असले तरी आता ऐन कडाक्याच्या उन्हात स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होत आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथे स्वाइन फ्लूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून उर्वरित दहा रुग्ण शहरात आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून येते. मागील आठ दिवसांत प्रभाग क्रमांक १५ मध्ये आठ ते नऊ डुकरांचा अचानक मृत्यू झाल्याचे समोर आले. मोकाट डुकरांमुळे अस्वच्छतेला हातभार लागत असल्यामुळे वराहपालन करणार्‍या व्यावसायिकांनी त्यांची डुकरे शहराबाहेर हलविण्याचा प्रस्ताव मनपाच्या सभागृहात मंजूर करण्यात आला होता. आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह वराहपालन करणार्‍या व्यावसायिकांना स्पष्ट निर्देश देत डुकरांचा बंदोबस्त करण्याचे बजावले होते. पुढे काहीही झाले नाही. मोकाट डुकरांना पकडण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे पाहून तसेच स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापौर विजय अग्रवाल यांनी डुकरांना पकडण्याचा कंत्राट देण्यासाठी निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.