शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:31 IST

अकोला : घराशेजारी राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाच्या घरात घुसून बळजबरीने त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने युवकास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

चार वर्षांपूर्वी केले होते लैंगिक शोषणअकोला : घराशेजारी राहणाऱ्या बारा वर्षीय मुलाच्या घरात घुसून बळजबरीने त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज. ख्वाजा यांच्या न्यायालयाने युवकास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जुने शहरातील एका भागात राहणारा बारा वर्षीय मुलगा वसतिगृहात राहतो. तो २८ एप्रिल २०१३ रोजी घरी आला. काकांच्या घरी गेल्यानंतर तो त्याच्या घरी परतला. घराशेजारी राहणारा आरोपी सागर दीनानाथ जाधव (२३) हा सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याच्या घरी आला. सागरने त्याला चांगले घर बांधले, जेवण केले का, असे विचारले आणि घरात कोणीही नसल्याचे पाहून मधल्या खोलीतील दरवाजा बंद केला. मुलाला जवळ ओढून त्याने त्याच्या अंगावरील कपडे काढले. यावेळी मुलाने त्याला विरोध केला; परंतु विरोधाला न जुमानता सागर जाधव याने त्याचे लैंगिक शोषण केले आणि कार्यभाग उरकून तो निघून गेला. ही बाब मुलाने त्याच्या काकांना सांगितली. त्यानंतर दोघांनीही जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भादंवि कलम ४५२, ३७७ पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय सतीश फरकाडे यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ.ज. ख्वाजा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. आरोपी व पीडित मुलाचा वैद्यकीय अहवालामध्ये लैंगिक शोषण झाल्याचे नमूद असल्याने, न्यायालयाने साक्षी व पुरावे ग्राह्य मानून आरोपी सागर देशमुख याला पॉस्कोमध्ये दहा वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावास, कलम ४५२ मध्ये दोन वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावास आणि कलम ३७७ मध्ये सात वर्षे कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या तीनही शिक्षा एकावेळेस आरोपीला भोगाव्या लागणार आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली. आरोपी म्हणे, तो मी नव्हेच !न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी सागर जाधव याने तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली आणि घटनेच्या दिवशी आपण सत्संगाला गेलो होतो, असे न्यायालयात सांगितले. त्याने दोन साक्षीदारसुद्धा उभे केले होते; परंतु त्याचा युक्तिवाद न्यायालयात टिकला नाही.आरोपी घेतो कायद्याचे शिक्षणआरोपी सागर जाधव हा शहरातील एका विधी महाविद्यालयात एलएलबी प्रथम वर्षाला शिकतो. त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे तर आयुष्य उद्ध्वस्त झालेच, पीडित मुलाचेही आयुष्य त्याने उद्ध्वस्त केले. शिक्षा सुनावल्यानंतर सागर जाधवला पश्चात्ताप झाला होता. त्याने न्यायालयातच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.