शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षीय बालक मृतावस्थेत आढळला

By admin | Updated: August 14, 2015 00:43 IST

मलकापूर येथील घटना; खुनाचा संशय, गुन्हा दाखल.

मलकापूर(जि. बुलडाणा) : दहा वर्षीय बालक येथील इदगाह मैदानाजवळील शेतात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी येथे घडली. शहरातील पारपेठ भागातील मुस्ताक अलीनगर भागात राहणारा कैफखान कलीमखान हा १0 वर्षीय बालक पारपेठ भागातील इदगाह मैदानावर असलेल्या सिद्दीक सुपडू यांच्या शेतातील नाल्याजवळ गंभीर अवस्थेत आढळून आला. सदर प्रकार निदर्शनास येताच त्याला हुसेनखां उस्मानखां व आसिफशाह बिसमिल्लाशाह या दोघांनी दुचाकीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी हजर असलेल्या डॉक्टरांनी कैफखान याची तपासणी केली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे कैफखान याला घरी नेण्यात आले. घरी पोहोचल्यानंतर तो जिवंत असल्याचे नातेवाइकांना वाटल्याने त्याला पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍याने त्याला खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला; मात्र त्यास खासगी रुग्णालयात नेले असता, कैफखान हा मृत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, याप्रकरणी मृतकाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत आरोपी शेख अनिस शेख मजिद (३७) याने कैफखान यास तिच्या घराजवळील नाल्याजवळ लाथ मारून पाडले व रूमालाने गळा दाबुन मारल्याचा आरोप केला. यावरून पोलीसांनी आरोपीस रात्री उशिरा अटक केली. * नातेवाइकांची रुग्णालयावर तुरळक दगडफेक व पोलीस ठाण्यात ठिय्या कैफखान यास उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी हयगय केल्याचा आरोप करून त्याच्या नातेवाइकांनी गोंधळ घातला तसेच तुरळक दगडफेक केली. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. यानंतर तणावाचे वातावरण निवळले. त्यानंतर पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.