शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बी-बियाणे खरेदीसाठी दहा हजारांचे कर्ज!

By admin | Updated: June 19, 2017 04:43 IST

शेतकर्‍यांना दिलासा: पालकमंत्र्यांनी घेतली कृषी, सहकार अधिकार्‍यांची बैठक.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सध्या खरिपाची पेरणी सुरू झाली आहे; परंतु शेतकर्‍यांना बँकांमार्फत कृषी कर्ज वाटप सुरू केले नाही, तसेच शासनाने केलेल्या कर्जमाफी निर्णयातील निकष, बँकांनी सुरू न केलेले कृषी कर्ज वाटपामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. ही बाब लक्षात घेता, जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यांना सोमवारपासून थकबाकीदार शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. राज्यात शेतकर्‍यांना दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणारा अकोला पहिला जिल्हा ठरणार आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्यासाठी शासनाने लावलेल्या निकषांमुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यासाठी शेतकर्‍यांना शासनाने थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने १0 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी जिल्हय़ातील कर्ज वाटपाची स्थिती, थकबाकीदार शेतकर्‍यांची संख्या, त्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करण्याबाबतची तयारी याचा आढावा घेतला आणि शेतकर्‍यांना सोमवारपासून तातडीने दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. जिल्हय़ात अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली; परंतु हजारो शेतकरी कृषी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे बी-बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांकडे पैसा नाही. ११ जून रोजी राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली; मात्र ही कर्जमाफी काही निकषांच्या अधीन राहून करण्यात आल्याने शेतकर्‍यांना नव्याने कर्ज वाटपासाठी मोठा विलंब लागणार होता. तोंडावर आलेली खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेता शेतकर्‍यांना बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार प्रत्येक शेतकर्‍याला १0 हजार रुपये शासन हमीवर तातडीने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकर्‍यांना कर्ज वाटप व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला आणि त्यासंबंधीचे अधिकार्‍यांना निर्देश दिले. बैठकीला जिल्हा उपनिबंधक के.जी. मावळे, खाडे, जिल्हा बँकेचे अनंत वैद्य, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.