शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना दहा हजारांच्या कर्ज वाटपाला प्रारंभ!

By admin | Updated: June 20, 2017 05:00 IST

बी-बियाणे, खते खरेदीसाठी दिलासा; पालकमंत्र्यांचा पुढाकार, जिल्हा बँकेची तत्परता.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईपर्यंत शासनाने थकबाकीदार शेतकर्‍यांना तातडीने १0 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी तातडीने कृषी विभाग, सहकार विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत सोमवारपासून तातडीने दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्हा बँकेच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात १0 हजारांचे कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला . शेतकर्‍यांना दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणारी अकोला जिल्हा सहकारी बँक ही पहिली बँक ठरली आहे. अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेमध्ये पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या कर्ज वाटपचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक के.जी. मावळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ.पाटील यांनी खरिपाची पेरणी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने बियाणे, खते खरेदीसाठी रक्कम उपलब्ध होणे आवश्यक होते. शासनाने केलेल्या कर्जमाफी निर्णयातील निकष, बँकांनी सुरू न केलेले कृषी कर्ज वाटपामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. ही बाब लक्षात घेता रविवारी जिल्हा बँक, सहकार खात्याच्या अधिकार्‍यांशी बैठक घेऊन थकबाकीदार शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन केले होते; ते आज प्रत्यक्षात आल्याने कर्ज वाटपाला प्रांरभ झाल्याचे समाधान असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा बँकचे अनंत वैद्य यांनी प्रारंभी प्रास्ताविकामध्ये दोन जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये असलेल्या सर्वच शाखामधून कर्ज वाटपासाठी नियोजन केले असल्याची माहिती दिली, तर जिल्हा उपनिबंधक माळवे यांनी कर्ज वाटपासाठी शेतकर्‍यांना कागदपत्रांच्या जाचक अटी नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी तेजराव चतरकर, महादेव गुलाबराव दुतोंडे, अनिल निकामे, पुरुषोत्तम गोंडचवर, राहुल जवंजाळ या शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यात आले. थकबाकीदार शेतक-यांना मिळणार लाभ ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकर्‍यांना तत्काळ दहा हजारांचे अग्रिम कर्ज मिळणार आहे. जिल्हय़ामध्ये ४४ हजार शेतकरी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे खातेधारक आहेत. यासोबतच इतर राष्ट्रीयीकृत बँकांचेसुद्धा आहेत. जिल्हय़ात जवळपास ७0 हजार थकबाकीदार शेतकरी या निकषामध्ये पात्र ठरत असल्याने अशा शेतकर्‍यांना बँकांकडून तातडीने दहा हजार रुपये कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त स्वयंघोषणा पत्र द्या! २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरीच दहा हजारांच्या तत्काळ कर्जासाठी पात्र ठरणार असल्याने अशा शेतकर्‍यांनी केवळ स्वयंघोषणा पत्राद्वारे संबंधित बँकेकडे कर्जाची मागणी करावयाची आहे. या स्वयंघोषणा पत्रानुसार त्याला कर्जाची रक्कम प्राप्त करता येईल. आणखी कोणत्याही कागदपत्राची पूर्तता करण्याची गरज नसल्याचे पालकमंत्री डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले. तोंडावर आलेली खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेता शेतकर्‍यांना बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होते. त्यासाठी ३0 जून २0१६ रोजीच्या थकबाकीदार प्रत्येक शेतकर्‍याला १0 हजार रुपये देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाल्याचे समाधान आहे. सहकार विभाग व जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीतून तातडीने नियोजन करणे शक्य झाल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. -डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री

मी अल्पभूधारक शेतकरी आहे. कर्जमाफीची घोषणा झाली मात्र, बी-बियाणे खरेदीसाठी पैसा नाही, अशी स्थिती होती. त्यामुळे तातडीने दहा हजारांचे अग्रिम कर्ज मिळाल्यामुळे पेरणीसाठी रक्कम हाती आली आहे. सर्वच शेतकर्‍यांना असे कर्ज तत्काळ मिळावे.- पुरुषोत्तम गोंडचवर, शेतकरी, खरप