शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

आणखी दहा मृत्यू, ८६७ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,८२३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,८२३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,१४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी दहाजणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये सौंदाळा, ता. तेल्हारा येथील ४१ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील ४४ वर्षीय महिला, गोडबोले प्लॉट येथील ४२ वर्षीय महिला, विझोरा, ता. बर्शीटाकळी येथील ५५ वर्षीय पुरुष, मूर्तिजापूर येथील ३५ वर्षीय महिला, बाखराबाद येथील ५६ वर्षीय पुरुष, खडकी येथील ६७ वर्षीय महिला, खदान येथील ५५ वर्षीय पुरुष, वाडेगाव येथील २४ वर्षीय पुरुष आणि खदान येथील ८४ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या

मूर्तिजापूर- ८३, अकोट-१४१, बाळापूर-५३, तेल्हारा-६०, बार्शी टाकळी-४८, पातूर-४४, अकोला-२४५. (अकोला ग्रामीण-४१, अकोला मनपा क्षेत्र-२०४)

५८४ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४२, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथील चार, देवसार हॉस्पिटल येथील सहा, क्रिस्टल हॉस्पिटल येथील एक, गोयका गर्ल्स हाॅस्टेल येथील तीन, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील चार, खासगी रुग्णालयातील ६५, तर होम आयसोलेशनमधील ४६५ अशा एकूण ५८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,८१२ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७,७९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४०,१४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,८१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.