शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या पेपरलाच दहा कॉपीबहाद्दर निलंबित

By admin | Updated: March 2, 2016 02:50 IST

दहावीची परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाच्या पथकांची अकोल्यात कारवाई.

अकोला: इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मराठी विषयाचा मंगळवारी पहिला पेपर होता. पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या तीन पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी टाकून दहा कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबित केले. जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. एकूण ३१ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. मराठी विषयाचा पेपर असल्याने परीक्षेला शांततेत सुरुवात होईल. अशी अपेक्षा होती; परंतु पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई झाली. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने पातूर तालुक्यातील चरणगाव येथील चेतना विद्यालय परीक्षा केंद्रावर अचानक धाड घातली. या परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पथकाने रंगेहात पकडले. त्यांना निलंबित करण्यात आले. दुसरी कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक)प्रकाश मुकुंद यांच्या पथकाने केली. आळंदा येथील जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रावर तीन कॉपीबहाद्दरांना कॉपी करताना पकडले. विशेष म्हणजे, जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी धाड घालून कॉपी करताना काही विद्यार्थ्यांना पकडले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पथकाने बाश्रीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले व निलंबित केले. परांडा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय परीक्षा केंद्रावरही कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पथकाने दोन विद्यार्थ्यांना निलंबित केले. ही कारवाई शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता परोपटे, आत्माराम राठोड यांनी केली.