शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तापमान घसरले; नागरिकांना दिलासा

By admin | Updated: April 24, 2017 01:46 IST

अकोला : गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.

अकोला : गत काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ओसरल्याने जिल्ह्याच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. होरपळून काढणाऱ्या उन्हाची दाहकता कमी झाल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत आठवड्यात अकोल्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली होती. उष्णतेची ही लाट चार ते पाच दिवस सुरूच होती. सातत्याने वाढणाऱ्या तापमानाने नागरिकांच्या जीवाची काहिली झाली. गत रविवारी या मोसमातील आतापर्यंतच्या सर्वोच्च ४५.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. निम्मा आठवडा ४४ अंशांच्या वरच तापमान होते. शनिवारपासून मात्र तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. शनिवारी अकोल्यात ४१.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. रविवारी तापमानात किंचित घट होऊन ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. आग ओकणाऱ्या सूर्याची प्रखरता कमी झाल्याने तापमान घटले आहे. परिणामी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आठवडाभरात ५ अंशांची घसरणउष्णतेची लाट पसरल्याने गत आठवडा होरपळीचा ठरला. गत रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. उष्णतेची लाट ओसरल्यामुळे तापमानातही घट होत असून, अकोल्यात रविवार, २३ एप्रिल रोजीचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. आठवडाभरातच पारा तब्बल ५ अंशाने घसरल्याने होरपळ कमी झाली आहे.