शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सांगा महापौरपद कोणाला द्यायचे?

By admin | Updated: March 4, 2017 02:33 IST

भाजपच्या प्रदेश सरचिटणीसांनी घेतली नगरसेवकांची मते.

अकोला, दि. ३- पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून शहर विकासाला प्राधान्य देण्याचा दावा करणार्‍या भारतीय जनता पार्टीने महापौर पदाच्या निवडणुकीतदेखील पारदर्शकतेचा मुद्दा कायम असल्याचे शुक्रवारी दाखवून दिले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी ह्यतुम्हीच सांगा महापौरपद कोणाला द्यायचेह्ण, असा प्रश्न उपस्थित करून पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची मते विचारात घेतली. राज्यातील दहापैकी आठ महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. अकोला महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला भरभरून मतांचे दान दिले. विकास कामांच्या बळावर भाजपचा सत्तेचा राजमार्ग मोकळा झाला असला, तरी पक्षाच्या अजेंड्यानुसार सत्ताधार्‍यांना पारदर्शक कामे करावीच लागतील, ही जबाबदारीसुद्धा ओघानेच आली आहे. येत्या ९ मार्च रोजी मनपामध्ये महापौर, उपमहापौरांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाने चालविली तयारीपदवीधर मतदारसंघ निवडणुकीपाठोपाठ महापालिके च्या निवडणुकीत यश मिळाल्यामुळे भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावला आहे. पक्षांतर्गत दोन गट दिसत असले, तरी दोन्ही निवडणुकीच्या काळात प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख निभावल्याचे दिसून येते. मनपा निवडणुकीची सूत्रे धोत्रे गटाकडे होती. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही धोत्रे गटाचा दबदबा कायम राहील, असे चित्र आहे. धोत्रे गटाकडून विजय अग्रवाल, वैशाली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे, तर दुसर्‍या गटाने हरीश आलिमचंदानी, आशिष पवित्रकार यांच्यासाठी तयारी सुरू केली आहे. अग्रवाल, शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ?महापौर पदाचा उमेदवार कोण असावा, यासाठी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची मते जाणून घेतली असली, तरी आजघडीला महापौर पदासाठी विजय अग्रवाल तर उपमहापौर पदासाठी वैशाली विलास शेळके यांचे पारडे जड मानल्या जात आहे.