शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा : सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कृषी सहायकास जीवे मारण्याची धमकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:49 IST

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहाय्याक एम. व्ही. सारभुकन यांना तळेगाव शेतशिवरातील पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रविवार, १७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात कृषी सहय्यकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देहिवरखेड पोलिसात दोघांविरूद्ध गुन्हा दाखलतहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहाय्याक एम. व्ही. सारभुकन यांना तळेगाव शेतशिवरातील पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रविवार, १७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेसंदर्भात कृषी सहय्यकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीसांनी दोघा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी रविवारी तळेगाव बु. परिसरातील शेत शिवारात तलाठी व कोतवाल यांना सोबत घेऊन गेलेल्या कृषी सहयक सारभुकन यांच्यावर पुंडलीक लक्ष्मण तांबडे व राहुल पुंडलीक तांबडे या बापलेकांनी ज्वारी ऐवजी कपाशीचे क्षेत्र लिहिण्यासाठी तबावतंत्राचा वापर केला. हे करित असताना त्यांनी सारभुकन यांना अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात कृषी सहाय्यक सारभुकन यांनी दिलेल्या तक्रारीवरून, हिवरखेड पोलिसांनी रविवारी रात्री पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे या दोघांविरूद्ध भारतीय दंड विधान ३५३, ५0४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

शासकीय कामात व्यत्यय निर्माणा करणार्‍या तांबडे बाप-लेकांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी सारभुकन यांनी एका निवेदनाद्वारे तेल्हार्‍याचे नायब तहसीलदार सुरळकर यांच्याकडे केली आहे. तहसीलदारांना निवेदन सादर करताना त्यांच्यासमवेत वाय.डी. अरदवाड, पी.जी. राऊत, एस.पी. राजनकर, एन. डी. खराटे, प्रदीप तिवाले, पी. डब्ल्यू. पेठे, एस. आर. कोरडे, एल.आर. सरदार, एस.आर. कोहळे, एस.डी. ठोंबरे, एस. डी. निचळ  यांच्यासह सर्व कृषी सहायक व तलाठी सुनील गिरी उपस्थित होते. कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर घटनेचा निषेध केला असून, शेतकर्‍यांवर कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव बोंडअळी सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. प्रतीउत्तरादाखल, तहसिलदारांनी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन देत कर्मचार्‍यांना सर्वेक्षण बंद न करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हारा