शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा बाजार समितीचे लाचखाेर सभापती, उपसभापती गजाआड; एक लाख रुपये घेताना रंगेहाथ

By सचिन राऊत | Updated: September 25, 2023 19:22 IST

एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक, अकाेला एसीबीची माेठी कारवाई

अकाेला : तेल्हार कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये शासनाच्या आधारभुत कींमत याेजनेतंर्गत नाफेड खरीप व रब्बी हंगामात हरभरा खरेदीसाठी तक्रारदार यांनी हमालांचा पुरवठा केल्यानंतर त्याचे १४ लाख ३९ हजार ५९२ रुपयांचे देयक काढण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तेल्हारा एपीएमसीच्या सभापती, उपसभापती या दाेघांना साेमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली़

अकाेला लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने ही माेठी कारवाई केली असून यामूळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समीती येथे नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी एका कंत्राटदाराने हमालांचा पुरवठा केला हाेता़ या पुरवठयाचे कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्यांनी १४ लाख ३९ हजार ५९२ रुपयांचे देयक सचिव सुरेश साेनाेने यांच्याकडे सादर केले़ त्यानंतर काही दिवसांनी कंत्राटदाराचे ४ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम धनादेश व राेख स्वरुपात अदा करण्यात आली़ मात्र ९ लाख ४६ हजार ५९२ रुपयांच्या देयकाची रक्कम थकीत असल्याने त्यांनी पुन्हा अर्ज करून मागणी केली असता सभापती सुनील माेतीराम इंगळे वय ४९ वर्ष, उपसभापती प्रदीप मधुकर ढाेले वय ६२ वर्ष व सचिव सुरेश साेनाेने या तीघांनी हमालांचा पुरवठार करणाऱ्या तक्रारदारास बाजार समीतीत बाेलावून एक लाख रुपयांची मागणी केली़ मात्र त्यांना लाच देणे नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार अकाेला एसीबीकडे केली़

यावरुन लाचलुचपत प्रतीबंधक विभागाचे प्रमूख उपअधीक्षक शैलेष सपकाळ व पथकाने २१ सप्टेंबर राेजी पडताळणी केली असता उपसभापती ढाेलेने लाच मागीतल्याचे स्पष्ट झाले तर सभापती इंगळे याने त्यास प्राेत्साहन दिल्याचेही एसीबीच्या पडताळणीत समाेर आले़ त्यानंतर २५ सप्टेंबर राेजी तेल्हारा बाजार समीतीत उपसभापती ढाेलेने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताच सभापती सुनील इंगळे व उपसभापती प्रदीप ढाेले या दाेघांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतीबंधक कायद्यान्वये तेल्हारा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाइ पाेलिस अधीक्षक मारूती जगताप, अपर पाेलिस अधीक्षक देवीदास घेवारे, अकाेला एसीबीचे प्रमूख शैलेष सपकाळ, पाेलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार व पथकाने केली़

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण