लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : अकोली रूपराव येथे जिल्हा परिषदचे स्वच्छता दूत ए. एस. नाथन यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळा अकोली रूपराव येथील चिमुकले राबवत असलेला हगणदरीमुक्तीचा पॅटर्न तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोहोचला आहे.ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सहकार्याने स्वच्छतादूत नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली हगणदरीमुक्त अभियान अकोली रूपराव येथे सुरू आहे. गावात हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे स्वच्छतादूत ए.एस. नाथन यांनी आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामध्ये टमरेल जप्तीपासून ते दंडात्मक कारवाईपर्यंतचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे गाव हगणदरीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. या गावातील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराला मिळालेल्या प्रतिसादामुळे तालुक्यातील इतर गावांतील विद्यार्थ्यांनीसुद्धा ही मोहीम पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. अकोली रूपराव गावातील विद्यार्थ्यांचा आदर्श घेत तालुक्यातील गावातील लोक स्वच्छता अभियान राबवित आहेत. तसेच विद्यार्थी घरोघरी जाऊन कलापथक करून मन स्वच्छ करीत आहेत. तालुक्यातील अकोली रूपराव, भोकर, जस्तगाव, सौंदळा, कार्ला, दापुरा येथे लहान मुलांची स्वच्छ सेना स्थापन करण्यात आली आहे. ए.एस. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी हगणदरीमुक्तीचा ध्यास घेतला आहे.
तेल्हारा : अकोली रूपराव हगणदरीमुक्तीचा पॅटर्न पोहोचला गावागावांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:23 IST
तेल्हारा : अकोली रूपराव येथे जिल्हा परिषदचे स्वच्छता दूत ए. एस. नाथन यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळा अकोली रूपराव येथील चिमुकले राबवत असलेला हगणदरीमुक्तीचा पॅटर्न तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोहोचला आहे.
तेल्हारा : अकोली रूपराव हगणदरीमुक्तीचा पॅटर्न पोहोचला गावागावांत!
ठळक मुद्देजि.प.च्या आवाहनास प्रतिसाद देत चिमुकले राबवत आहेत हगणदरीमुक्तीचा पॅटर्न