शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

किशोरवयीन मुलींच्या प्रशिक्षणाचा निधी अखर्चित

By admin | Updated: May 22, 2017 01:09 IST

अकोला : महिला विकास कार्यक्रमातून महिलांना सक्षम करण्यासाठी चालू वर्षात मंजूर असलेल्या योजना अखेर बारगळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महिला विकास कार्यक्रमातून महिलांना सक्षम करण्यासाठी चालू वर्षात मंजूर असलेल्या योजना अखेर बारगळल्या. त्यासाठी आता जिल्ह्यातील आठही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटिस देऊन खर्च न होण्यासाठी जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. सोबतच योजना राबवणारी यंत्रणा म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटिस देण्याचा आदेश महिला व बालविकास अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांनी आधीच दिला होता. त्यावर काहीच झाले नसल्याची माहिती आहे. महिलांना प्रशिक्षणातून सक्षम बनवण्यासाठी लाखोंची तरतूद असलेल्या योजनांची प्रक्रिया आर्थिक वर्षाच्या अंतिम काळात सुरू करण्यात आली. महिला सक्षमीकरणासाठी मंजूर असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिला समुपदेशन केंद्र चालवणे, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणे, ७ ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण, मोबाइल, संगणक दुरुस्ती, बेकिंग व कॅटरिंग प्रशिक्षण, ग्रामीण भागातील महिला व मुलींना नर्स, परिचारिकेचे प्रशिक्षण देणे, सौंदर्य प्रसाधने प्रशिक्षण, पदवीधर मुलींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, मराठी व इंग्रजी टायपिंग, किशोरवयीन मुली व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन कायदेविषयक प्रशिक्षण, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, बालवाडीसेविका, मदतनीस यांच्यासाठी प्रशिक्षण, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्याच्या योजनांचा समावेश आहे. लाखो रुपये प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पडूनत्यापैकी किशोरवयीन मुली व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन कायदेविषयक प्रशिक्षणाच्या योजनेसाठी १६ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.हा निधी २२ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्ह्यातील आठही प्रकल्प अधिकाऱ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आला. मात्र, कुठेच योजना राबवण्यात आली नाही. त्यामुळे निधी पडून आहे.ठरावानंतर दहा महिन्यांनी निधी वाटपप्रशिक्षण योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने २७ एप्रिल २०१६ रोजीच ठराव घेतला होता. त्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी निधीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी प्रशिक्षण कार्यक्रम कसे घ्यावे, या संभ्रमात निधी अखर्चित ठेवण्यात आला.