शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’च्या ‘डीपीआर’ला तांत्रिक मंजुरी

By admin | Updated: September 18, 2015 00:55 IST

६0 एमएलडी प्लांटसाठी २५८ कोटींची मान्यता.

अकोला: 'अमृत' योजनेंतर्गत भूमिगत गटार योजनेच्या सुधारित 'डीपीआर'ला (प्रकल्प अहवाल) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रकल्प संचालकांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे. अकोला शहराची लोकसंख्या लक्षात घेता ६0 एमएलडी प्लॅन्टसाठी २५८ कोटी रुपयांची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाकडून लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.शहरातील घाण पाण्याचा निचरा करून शेती किंवा उद्योगासाठी पुनर्वापर करण्याची दुहेरी योजना म्हणून भूमिगत गटार योजनेकडे पाहिल्या जाते. २00७ मध्ये ही योजना शहरासाठी मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी १00 एमएलडी प्लांटसाठी ३२0 कोटी रुपये मंजूर होऊन पहिल्या टप्प्याचे ५४ कोटी रुपये मनपाला प्राप्त झाले होते. मनपातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत तांत्रिक सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने यासंदर्भात भाजप-शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निविदा प्रक्रिया रद्दबातल करून नव्याने प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. २0१४ मध्ये योजनेचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे कंत्राट मे.युनिटी कन्सलटन्सीला (पुणे) देण्यात आला. युनिटीने डीपीआर तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी मुंबईतील नरिमन पॉइंटस्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सोपवला. तेव्हापासून हा डीपीआर मंजुरीअभावी पडून होता. यादरम्यान, मनपामार्फत बँकेत जमा असलेल्या ५४ कोटींचे व्याजासह ८२ कोटी रुपये 'अमृत'मध्ये वळता करण्याचा निर्णय नगर विकास विभागाने २0 ऑगस्ट रोजी घेतला. तेव्हापासूनच भूमिगतच्या डीपीआरला तांत्रिक मंजुरी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अखेर मजीप्राच्या प्रकल्प संचालकांनी २५८ कोटींच्या योजनेला तांत्रिक मंजुरी दिली.