शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची काढली छेड; आईने विरोध करताच केला हल्ला

By आशीष गावंडे | Updated: June 1, 2024 23:56 IST

मुलगी जखमी; सराफ बाजारातील घटना सीसीटीव्ही कैद.

अकाेला:शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफ गल्लीत शनिवारी भरदिवसा दोन अज्ञात युवकांनी एका मुलीची छेड काढली. या युवकांना विराेध करणाऱ्या तीच्या आइला युवकांनी रस्त्यावर मारहाण सुरु केली. आइच्या बचावासाठी आलेल्या मुलीच्या पाेटात तिक्ष्ण हत्याराने वार करताच मुलगी जखमी हाेऊन रस्त्यावर काेसळली. दरम्यान,ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्यामुळे काेतवाली पाेलिस दाेन्ही युवकांचा छडा लावतील का, याकडे लक्ष लागले आहे. 

सराफ बाजारातील नाल्यांमध्ये साेन्याचा धातू शाेधणाऱ्या मायलेकींवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. सराफ गल्लीतून मायलेकी जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली. या प्रकाराला मुलीच्या आइने विरोध केला असता युवकाने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून समाेर गेलेली मुलगी मदतीसाठी धावली. या झटापटीत युवकाने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने मुलीच्या पाेटात वार केला. वार वर्मी बसल्यामुळे ही मुलगी लगेच जमिनीवर कोसळली. यावेळी तीच्या आइने मारहाण करणाऱ्या त्या युवकांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. जखमी मुलीला सर्वाेपचारमध्ये भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद करण्यात आली आहे. 

चिडीमार,लुटमारांचा बंदाेबस्त कधी?काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत शहरातील प्रमुख बाजारपेठ वसली आहे. गांधी चाैक, जुना धान्य बाजार, काेठडी बाजार,सराफ बाजार, काला चबुतरा परिसरातील बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या महिला व तरुणींची स्थानिक युवकांकडून नेहमीच छेड काढली जाते. तसेच पाकिटमार व साेने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या साेन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्यांचाही बाेलबाला राहताे. अशा चिडीमार व लुटमार करणाऱ्यांना सिटी काेतवाली पाेलिस कधी गजाआड करणार,  असा सवाल उपस्थित झाला आहे.

...तर अदखलपात्र गुन्हा कसा?सराफ बाजारात महिला व तीच्या मुलीला मारहाण करीत असल्याची घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. एखाद्या किरकाेळ परंतु मलइदार प्रकरणात पाेलिस भादंवि कलम ३०७चा वापर करतात. परंतु याठिकाणी मुलीच्या पाेटात तिक्ष्ण हत्याराने वार केल्यानंतरही सिटी काेतवाली पाेलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद केली आहे. या प्रकाराकडे जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह, शहर पाेलिस उपअधीक्षक सतीष कुलकर्णी लक्ष देतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Akolaअकोला