शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या ‘जैसे थे’!

By admin | Updated: April 18, 2017 01:41 IST

आश्वासनानंतरही प्रकार सुरुच : जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ

अकोला : जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये संबंधित अधिकारी मनमानीपणे शिक्षकांच्या बदल्या करतात, प्रतिनियुक्त्या देतात, या मुद्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करून कारवाईचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतरही हा प्रकार सर्वत्र सुरूच आहे. त्यातच बाळापूर, तेल्हारा पंचायत समितीमध्ये हा प्रकार नव्याने घडल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक १६ मार्च रोजी पार पडली. त्यावेळी बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये १४ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून केली जाईल, त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यापैकी काही-काही शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे दाखवण्यात आले. आता त्या पुन्हा ‘जैसे थे’ केल्याची माहिती आहे. त्यामध्ये कातखेड, जामवसू, मांगुळ, झोडगा, राहित-२, दोनद खुर्द, एरंडा येथे शिक्षकांना प्रतिनियुक्त्या देण्यात आल्याची माहिती आहे. सोबतच अकोला तालुक्यातील पाटी येथील मुख्याध्यापकाबाबतही हा प्रकार घडला आहे. त्याशिवाय तेल्हारा पंचायत समितीमध्ये ८ तर बाळापूर पंचायत समितीमध्ये तीन उर्दू माध्यमातील शिक्षकांना प्रतिनियुक्त्या दिल्याची माहिती आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी उन्हाळे यांनी शिक्षिका उनोने आणि साळुंके यांच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये पुणे येथून आलेल्या उनोने यांना आडसूळ येथे पदस्थापना दिली. त्या रुजू झाल्या नाहीत. उन्हाळे यांची बदली झाली. त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांचा आदेश फिरवत उनोने यांना अकोला तालुक्यातील गोरेगाव येथे रुजू होण्याचे आदेश दिले. त्याचवेळी पदाधिकाऱ्यांनी मागणी करूनही अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली, प्रतिनियुक्तीबाबत अधिकारी बोळवण करतात, हा मुद्दाही सदस्यांनी मांडला. त्यावरही अद्यापही आदेश न झाल्याने त्याबाबत सभापतींनाच विचारणा करावी लागत आहे.