शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त शिक्षकांचे प्राण वाचविण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

पातूर : पंचायत समिती पातूरमधील जि. प. प्राथमिक शाळा विवरा क्रमांक २ येथील कार्यरत शिक्षक जे. डी. शिरसाट ...

पातूर : पंचायत समिती पातूरमधील जि. प. प्राथमिक शाळा विवरा क्रमांक २ येथील कार्यरत शिक्षक जे. डी. शिरसाट यांचा गत आठवड्यात अपघात झाला होता. त्यांच्या उपचारासाठी लागणारी रक्कम जमा करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.

शिक्षक शिरसाट यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना अकोला येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या हात, पाय, बरगड्या यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकीतून शिक्षक शशिकांत गायकवाड, अ. म. वानखडे, शंकरराव तायडे, शैलेंद्र गवई, धीरज खंडारे, श्रीकांत वानखडे यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार सामाजिक बांधीलकी जपत शिक्षकांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करून शिरसाट यांच्या उपचारासाठी सढळ हातांनी निधी उभारला आहे.

फोटाे: मेल फोटोत

१६३ शिक्षकांनी उभारले दीड लाख

शिक्षक जे. डी. शिरसाट यांच्या उपचारासाठी आतापर्यंत १६३ शिक्षकांनी १ लाख ५० हजार १०० रुपयांपैकी काही रक्कम रोख स्वरूपात तर काहींनी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा केली. पुढील दोन-तीन दिवसांत आणखी रक्कम गोळा करण्यात येणार आहे.

शिक्षक पतसंस्थेकडून एक लाखाची मदत

पतसंस्थेचे संचालक शशिकांत गायकवाड यांनी पतसंस्थेकडून अपघात निधी म्हणून एक लाख रुपये मदत करण्याचे सुचविले असता, पतसंस्थेने त्वरित एक लाख रुपयांचा धनादेश शिक्षक शिरसाट यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिक्षक शिरसाट यांच्या पत्नी ज्योती जनार्दन शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ इंगोले, ॲड. नीलेश शिरसाट यांच्याकडे रक्कम प्रदान केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जि .प. मा. कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकाऱ्यांसह पुरुषोत्तम मंडासे, प्रशांत सिरसाट, राजकुमार वानखडे, अशोक शिरसाट उपस्थित होते.