शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समायोजनाचा घोळ!

By admin | Updated: July 27, 2016 01:53 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या पदोन्नतीपूर्वीच समायोजनाचा घाट घातला असल्याचे दिसुन येत आहे.

संतोष येलकर / अकोलाजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हय़ात जिल्हा परिषद शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या २८९ शिक्षकांचे समायोजन ३0 जुलै रोजी जिल्हय़ातील सातही पंचायत समिती स्तरावर करण्यात येणार आहे; परंतु बिंदुनामावली मंजूर नसताना आणि पदोन्नतीची प्रक्रिया रखडली असल्याच्या स्थितीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा घाट रचण्यात आल्याने, अतिरिक्त शिक्षकांच्या या समायोजनातही घोळ होणार आहे.ऑगस्ट २0११ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकपदाची पदोन्नती दिल्यानंतर, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे; परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची गत सात वर्षांपासून बिंदुनामावली (रोस्टर) मंजुरीची प्रक्रिया रखडली आहे. बिंदुनामावलीच्या मंजुरीअभावी जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडली आहे. त्यासोबतच गतवर्षीपासून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनही रेंगाळले आहे. जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात जिल्हा परिषद शाळांवर २८९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर जिल्हय़ात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग आणि ग्राम विकास विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांचे सातही पंचायत समिती स्तरावर ३0 जुलै रोजी समायोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने पंचायत समिती स्तरावर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, जिल्हय़ातील पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया मात्र अद्याप रखडली आहे. पदोन्नतीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा घाट रचण्यात आला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत घोळ होण्याची चिन्हे दिसत आहेत.