शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरती: पवित्र पोर्टलवर माहितीच अद्ययावत नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:16 IST

अकोला: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांच्या शिक्षण संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. रिक्त जागांसाठी शिक्षक पवित्र पोर्टलवर माहिती भरत आहेत; परंतु पवित्र पोर्टल अनेक जागांची माहितीच अद्ययावत करण्यात आली नाही.

अकोला: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांच्या शिक्षण संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. रिक्त जागांसाठी शिक्षक पवित्र पोर्टलवर माहिती भरत आहेत; परंतु पवित्र पोर्टल अनेक जागांची माहितीच अद्ययावत करण्यात आली नाही. तसेच सवलतींच्या बाबतीतही उमेदवार गोंधळात आहेत. शासनाने १२ हजार पदांची माहिती पवित्र पोर्टलवर दिल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात जागा मात्र, कमी दिसत आहेत.शिक्षक भरती सुरू झाल्यामुळे बेरोजगार शिक्षक उमेदवारांमध्ये आनंदाची लाट पसरली होती; परंतु ही हळूहळू ओसरत आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवार शिक्षकांकडून माहिती भरण्यात येत आहे. शिक्षकांना अमर्याद जागा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी, काही जातींच्या जागा खूपच कमी आहेत. भटक्या जमाती, विमुक्त जाती, खुला प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीयांच्या तर बोटावर मोजण्याइतपतच जागा शिक्षण संस्थांच्या जाहिरांतीमध्ये दिसून येतात. त्यातही माजी सैनिकांसाठीही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार शिक्षक उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले आहे. शासनाने पवित्र पोर्टलवर १२ हजार रिक्त जागांची माहिती दिल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात जागा कमी दिसत आहे. तसेच शासनाने आणखी शिक्षण संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने अपलोड करण्याचे म्हटले आहे. पवित्र पोर्टलवर जागा, आरक्षण, सवलतींबाबतची माहिती अद्याप अपलोड करण्यात न आल्यामुळे शिक्षक उमेदवारांचा गोंधळ उडतो आहे. पवित्र पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.विदर्भात सर्वात कमी जागा!पवित्र पोर्टलवर विदर्भातील शिक्षण संस्थांच्या रिक्त जागा फारच कमी दाखविण्यात आल्या आहेत. सर्वाधिक जागा या पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण संस्थामध्ये आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये विदर्भातील उमेदवारांवर अन्याय होणार आहे. बोटावर मोजण्याइतपतच जागा विदर्भातील शिक्षण संस्थांमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांच्या राखीव जागा दिसतच नाहीत!शासनाने शिक्षक भरतीमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांसाठी एक टक्के जागा राखीव केल्या आहेत; परंतु पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या शिक्षण संस्थांच्या जाहिरातींमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांसाठीच्या एक टक्के जागा दिसतच नसल्यामुळे कॅटेगरीतून अर्ज करण्याशिवाय शेतकऱ्यांच्या पाल्यांना गत्यंतर नाही. शासनाने राखीव केलेल्या जागा कुठे आहेत, हे निदान दाखवावे तरी, जेणेकरून शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्यांना राखीव जागांवर अर्ज भरता येतील, असा सवाल शेतकऱ्यांच्या पाल्यांनी उपस्थित केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती