वाशिम: विदर्भातील हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त करुन समायोजन करण्याची शालेय शिक्षण विभागाची प्रक्रीया आचार संहितेचा भंग करणारी असल्यामुळे त्यास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह, माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूाक अधिकार्यांकडे एका निवेदनाव्दारे केली असल्याची माहिती विमाशीचे प्रांतीय उपाध्यक्ष एस.जी.बरडे यांनी शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी दिली.सेवेत असलेल्या शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या सेवक सेवा तात्काळ समाप्त करणे व शेकडो अतिरिक्त ठरलेले शिक्षक कर्मचारी जे निवडणुकीच्या कामात आहेत अशांना अतिरिक्त करणे व समायोजन करणे या सर्व बाबी आचार संहितेचा भंग करणार्या असल्यामुळे या संपूर्ण प्रक्रीयेस स्थागिती देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांनी केली आहे.या निवेदनाची प्रत विमाशीचे प्रांतीय उपाध्यक्ष एस.जी.बरडे यांचे नेतृत्वात सोमवार २२ सप्टेंबररला विभागीय आयुक्त अमरावती व जिल्हा निवडणुक अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आली आहे.
शिक्षक कर्मचारी अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रीया आचार संहितेचा भंग करणारी
By admin | Updated: September 26, 2014 23:33 IST