अकोला : राष्ट्रीय व राज्यस्तरावर दिल्या जाणार्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा आता २६ जानेवारी ऐवजी १५ ऑगस्टला करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदापासूनच या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे. राज्य शासनाच्यावतीने ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी स्त्री साक्षरता आणि मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विशेष कार्य करीत असलेल्या स्त्री शिक्षकांना ह्यआदर्श शिक्षिका पुरस्कारह्ण जाहीर करण्यात येतात. राज्य शिक्षक पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकांना देण्यात येतो. तसेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाकडून विविध राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर केला जातो. हे सर्व पुरस्कार ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी बहाल करण्यात येतात. सोमवारी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या बदलाच्या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले असून, संबंधित विभागाकडे ते पाठविण्यात आले आहे.
शिक्षक पुरस्कारांची घोषणा आता १५ ऑगस्टला
By admin | Updated: January 20, 2015 23:55 IST