शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चहाविक्रेत्याने गिळंकृत केला फलाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 02:48 IST

जुन्या बसस्थानकावरील प्रकार; भरदुपारी प्रवासी शोधतात सावली.

अकोला, दि. १७- टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकाचा एका फलाट एका चहाविक्रेत्याने अनधिकृतरीत्या गिळंकृत केला आहे. डोळय़ादेखत सुरू असलेल्या या प्रकाराकडे महामंडळ अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे, भर दुपारी बसण्याकरिता प्रवाशांना सावली शोधावी लागत आहे. जिल्हय़ातील ग्रामीण भागाशी अतूट नाते असलेल्या टॉवर चौकातील जुन्या बसस्थानकावर अधिकृत व्यवसाय करण्यासाठी एसटी महामंडळाने सात जणांची कंत्राट पद्धतीने नेमणूक केली होती. त्यामध्ये बुक स्टॉल, जनरल स्टोअर, चहा विक्री, रसवंती, सलून, दूरध्वनी कक्ष व झेरॉक्स असे विविध व्यवसाय असून, त्यापैकी जी. के. तर्‍हाळे या चहाविक्रेत्याने चक्क बसस्थानकाचा एक फलाटच गिळंकृत केला असल्याचे चित्र आहे. अतिक्रमित फलाटावरील बाकड्यांचा उपयोग हा चहाविक्रेत्याकरवी गिर्‍हाईकांना बसण्यासाठी केला जातो. परिणामी, भर दुपारी वाढत्या तापमानामुळे वैतागलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी सावली शोधावी लागते. राज्यातील कुठल्याच बसस्थानकावरील फलाट अशा पद्धतीने एसटी महामंडळाने व्यावसायिक तत्त्वावर वापरण्यास अद्याप तरी परवानगी दिलेली नाही; मात्र जुन्या बसस्थानकावर सुरू असलेल्या प्रकाराकडे महामंडळ अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. एसटी महामंडळाला महिन्याकाठी ५ हजार ३२३ रुपये मासिक भाडे देणार्‍या चहाविक्रेत्याने उस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्याचा प्रकार आरंभला असून, परवानगी नसतानासुद्धा अशा पद्धतीने व्यवसाय करणार्‍या चहाविक्रेत्यावर वरदहस्त कुणाचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. एसटी महामंडळाने जुन्या बसस्थानकावर सात लघुव्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यापोटी त्यांच्याकडून सेवाकरासहित भाडे आकारले जाते. सप्टेंबर २0१४ मध्ये मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम केली होती. त्यानंतर या व्यावसायिकांनी बसस्थानकाच्या इतर भागात आपला व्यवसाय सुरू केला. चहाविक्रेत्यासंदर्भात अद्याप आमच्याकडे कुठलीच तक्रार आलेली नाही; मात्र त्याने फलाटावर अतिक्रमण केले असल्यास निश्‍चितच त्याच्यावर कारवाई केली जाईल.- सचिन क्षीरसागर, डीटीओ, अकोला