शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री रुग्णालयाच्या ३२८ कर्मचा-यांच्या ‘टीडीएस’चा घोळ कायम

By admin | Updated: April 3, 2017 03:02 IST

२00९ पासून २0१७ पर्यंंतची जुळवाजुळव सुरूच; आयकर विभागाची पुन्हा नोटिस.

संजय खांडेकर अकोला, दि. २- अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील २८ डॉक्टर आणि ३२८ वैद्यकीय कर्मचार्‍यांचा तब्बल चार वर्षांंच्या ह्यटीडीएसह्णचा घोळ अजूनही कायम आहे. ३१ मार्चपर्यंंत हिशेब जुळवाजुळव करण्याचा शब्द जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाने दिला होता. मात्र, आठ वर्षांंतील दस्ताऐवज न मिळाल्याने आयकर विभागाकडे जिल्हा स्त्री रुग्णालयाची यंत्रणा फिरकलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या ह्यसीपीसीह्णतर्फे शेकडो कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पुन्हा नोटिसेस बजावल्या जात आहेत.अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील २0 नियमित वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एसएनसीयू विभागातील आठ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि ३00 कर्मचार्‍यांचा तब्बल आठ वर्षांंचा टीडीएस गहाळ झाला आहे. त्यामुळे येथील शेकडो अधिकार्‍यांना नोटिस बजाविल्या जात आहेत. २00९ पासून २0१७ पर्यंंतच्या ५0 लाखांच्यावरील टीडीएस कपातीची आकडेवारी जुळलेली नाही. अकोला आयकर विभागाने वैद्यकीय अधिकार्‍यांना व्यक्तीश: आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. कुलवाल यांना नोटिस बजाविली आहे. ३१ मार्चपूर्वी हा हिशेब जुळविण्याचे सांगितले होते. मात्र, अजूनही स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाला त्यात यश आलेले नाही. सात वर्षांंपर्यंंत प्रकरण शिथिल ठेवण्याचे अधिकार आयकर विभागाला आहे. या प्रकरणात आठ वर्ष झाल्याने यामध्ये दंडात्मक कारवाई होण्याचे संकेत स्पष्ट होत आहे.जिल्हा स्त्री रुग्णालयातील नियमित वैद्यकीय अधिकार्‍यांना ८0 हजार ते एक लाख रुपयांपर्यंंत वेतन आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांना ४0 ते ६0 हजार रुपये मानधन आणि अधिकारी-कर्मचारी असलेल्या विविध विभागातील ३00 कर्मचार्‍यांना विविध पदानुसार वेतन दिले जाते. एकंदरित ३२८ अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वेतनातून २00९ पासून दरमहा नियमित टीडीएस कापला गेला. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आस्थापना विभागाकडून नियमानुसार ही कपात होत असली, तरी ती रक्कम अजूनही आयकर विभागाच्या खात्यात दिसलेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने डॉक्टर आणि अधिकारी यांना टीडीएस न भरल्याची नोटिस बजाविली आहे. गेल्या आठ वर्षांंचा कपात झालेला टीडीएस गेला कुठे, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. पगार बिलातून टीडीएसची कपात नियमित झाली असून, त्याचा भरणादेखील ट्रेझरीत केला गेला आहे. मॅन्युअली नोंदीत पॅन कार्ड क्रमांक चुकल्याने आणि कपात केलेला टीडीएसचा हप्ता ठरावीक वेळेच्या आत न भरल्याने हा घोळ झाला. दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे -डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.