विवेक चांदूरकर / अकोला : महाराष्ट्र दिनी शाळांचे निकाल लागल्यानंतर शिक्षकांची विद्यार्थी मिळविण्यासाठी ह्यरेसह्ण सुरू झाली आहे. पटसंख्या नसली तर तुकड्याच बंद होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची चक्क खरेदी केली जात आहे. दुसरीकडे जास्त पैसे व सुविधा देणार्यांनाच शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) देण्याचा लिलाव पालकांच्यावतीने करण्यात येत आहे. विद्यार्थी मिळविणे हेच लक्ष्य असलेल्या शिक्षण संस्था व शिक्षकांकडून आमिषे दाखविण्यापासून ते साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्यात येणार आहे. कॉन्व्हेंट शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल व शिक्षण अधिकाराच्या (आरटीई) बडग्यामुळे शिक्षण सम्राट हादरले आहेत. शिक्षकांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली. विद्यार्थी आणण्याचे टार्गेटच शिक्षकांना देण्यात आले असून, टार्गेट पूर्ण न करणार्यांच्या पगारात कपात करण्यात येते. हा खासगी संस्थाचालकांनी अलिखित नियम बनविला असून, शिक्षकांना वेठीस धरण्यात येत आहे. त्यामुळे कधीकाळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आनंद उपभोगणारे शिक्षक आता मॅनेजमेंटने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करीत तापत्या उन्हात विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांचा निकाल १ मे रोजी लागला. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम लागू झाल्याने इयत्ता १ ली ते ८ वी पयर्ंतचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण केले जाणार आहेत. इयत्ता पाचवीमध्ये कोणत्या गावातील किती विद्यार्थी आपल्या शाळेला मिळतील, याचा अंदाज घेऊन त्यांच्याशी संपर्क करण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ९११ आणि खासगी प्राथमिक शाळा ३९0 आहेत. विविध आमिषे दाखवून शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यार्थी पुरविण्याचे काम करणारे काही एजंट यांच्यामध्ये सध्या खलबते सुरू आहेत. शाळेत विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना विविध रूपात भेटवस्तू, रोख रक्कम देण्याची पाळी शिक्षकांवर आलेली आहे. परीक्षा संपल्याबरोबरच शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण भटकंती सुरू झाली आहे.
‘टी.सी.’ झाली अनमोल, विद्यार्थ्यांचा लिलाव
By admin | Updated: May 12, 2015 01:36 IST