शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागातील उद्यान, ‘ओपन स्पेस’वर कर आकारणी

By admin | Updated: July 8, 2017 02:14 IST

टॅक्स विभागाचा अफलातून कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशातून प्रशासनाने शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला. त्याकरिता ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचा सर्व्हे केला. नागरिकांना सुधारित करप्रणालीच्या नोटिस दिल्या जात असतानाच प्रभागातील उद्यान तसेच सार्वजनिक वापरासाठी असलेल्या ‘ओपन स्पेस’वर कर आकारणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे उद्याने किंवा ओपन स्पेसचा कर नेमका कोणी जमा करायचा, यावरून नगरसेवकांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या आणि शहरातील विकास कामे निकाली काढण्यासाठी मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचा सर्व्हेकरून पुनर्मूल्यांकन केले. १९ वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच पारदर्शीपणे चटई क्षेत्रानुसार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे. सुधारित करप्रणाली लागू केल्यानंतर नागरिकांना नोटिसचे वितरण केले जात आहे. दक्षिण झोनमध्ये २९ हजार मालमत्तांची संख्या आहे. सुनावणीच्या माध्यमातून मालमत्ताधारकांचे आक्षेप निकाली काढल्या जात आहेत. यादरम्यान प्रभाग १९ मध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी असलेले ‘ओपन स्पेस’ किंवा उद्याने यांनादेखील मालमत्ता कराच्या नोटिस जारी करण्यात आल्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. मालमत्तेचे वर्णन निवासी म्हणून दाखविण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांच्या डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे. गणेश उद्यानाचा मालक कोण?ल्ल प्रभाग १९ मध्ये नागरिकांनी एकत्र येऊन गणेश नगर परिसरातील ‘ओपन स्पेस’वर स्वखर्चातून गणेश उद्यान उभारले. त्या ठिकाणी बालकांसाठी खेळणी, लोखंडी स्टॅन्ड तयार करून वृत्तपत्र वाचनाची सुविधा, वृक्षांना ‘ट्री गार्ड’, वॉकिंग ट्रॅकची व्यवस्था केली असून, उद्यानात शोभिवंत झाडे लावली आहेत. यासाठी लोकप्रतिनिधीमार्फत किंवा मनपा निधीचा वापर झाला नाही. असे असताना मनपा प्रशासनाने मालमत्तेवर भोगवटादाराचे नाव श्री गणेश उद्यान असा उल्लेख केल्यामुळे नागरिक चक्रावले आहेत.परिसरातील नागरिकांनी स्वखर्चातून गणेश उद्यानाची निर्मिती केली. मनपाने गणेश उद्यानाच्या नावाने ३ हजार ८१६ रुपयांची करप्रणालीची नोटिस जारी केल्यामुळे हा कर कोणी आणि कशासाठी जमा करायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढावा. -योगीता पावसाळे, नगरसेविका प्रभाग १९‘जीआयएस’ प्रणालीद्वारे संपूर्ण शहरातील मालमत्तांचा सर्व्हे झाला. त्यामध्ये खुले भूखंड, उद्यान, बगिचा आदींचासुद्धा समावेश आहे. संगणकीय प्रणालीमुळे अशा मालमत्तांना क्रमांक देऊन क्षेत्रफळानुसार त्यांना कर आकारणी करण्यात आली. सार्वजनिक वापरासाठी असलेले ‘ओपन स्पेस’, उद्यान-बगिचा यांना कर लागू होणार नाही. नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. -अजय लहाने, आयुक्त मनपा.