शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्स वसुली; आज मुंबईत बैठक

By admin | Updated: April 20, 2017 01:43 IST

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. बुधवारी रात्री मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह इतर अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

मनपा आयुक्त, अधिकारी रवानाअकोला : मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ही वाढ नेमकी कशामुळे होईल, आजपर्यंत वाढ न होण्याची कारणे कोणती, यासंदर्भात सविस्तर चर्चा करून मनपाने केलेल्या पुनर्मूल्यांकनाचे सादरीकरण पाहण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या गुरुवारी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीसाठी बुधवारी रात्री मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह इतर अधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून पुनर्मूल्यांकनच झाले नाही. २००२ मध्ये मालमत्ता कराच्या रकमेत वाढ केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत कर दरवाढीला प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी ठेंगा दाखविल्याचे चित्र आहे. आजवर मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्ताधारकांची नोंद होती. त्यापासून केवळ १६ ते १८ कोटी रुपये वार्षिक कर वसुली होत असे. शहरात मालमत्तांचे प्रमाण अधिक असतानादेखील मनपाच्या उत्पन्नात वाढ होत नसल्याचे पाहून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. स्थापत्य कन्सलटन्सीला मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकृत नोंदी करण्याचे काम देण्यात आले. कंपनीच्या सर्व्हेनुसार नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ५ हजारांच्या आसपास मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे. मालमत्ताधारकांवर आकारल्या जाणाऱ्या कर प्रणालीपासून मनपाच्या उत्पन्नात सुमारे ६० ते ७० कोटींची वाढ होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसूल होत असेल, तर त्याची कारणे काय, आदी बाबींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मनपा आयुक्तांना मुंबईत पाचारण केले आहे. बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त अजय लहाने, स्थापत्य कन्सलटन्सीचे अमोल डोईफोडे, कर अधीक्षक विजय पारतवार मुंबईसाठी रवाना झाले.