शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्स दरवाढ; भारिप-बमसंची याचिका निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 12:44 IST

अकोला: महापालिका प्रशासनाने तब्बल ६० टक्के दराने करवाढ केल्याचा आक्षेप नोंदवत भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांनी निकाली काढली आहे.

अकोला: महापालिका प्रशासनाने तब्बल ६० टक्के दराने करवाढ केल्याचा आक्षेप नोंदवत भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांनी निकाली काढली आहे. यासंदर्भात १५ मार्च रोजी नगर विकास विभागातील कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी पत्र जारी केले आहे.महापालिका प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ केली. प्रशासनाने चक्क ६० टक्के दराने करवाढ केल्याचा आरोप करीत मनपातील भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवर सुनावणी झाली असता, पक्षाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर तसेच महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी भूमिका नमूद केली होती. प्राप्त सुनावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी शासनाकडे तेरा पानांचा अहवाल सादर केला. शासनाने या अहवालावर निकाल देण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने करण्यात आली होती. यासंदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यानंतरही शासन हा तिढा निकाली काढत नसल्याचे पाहून भारिपच्यावतीने ८ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर १५ फेब्रुवारी रोजी द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली असता, शासनाच्यावतीने अधिवक्ता आनंद देशपांडे यांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून टॅक्सच्या मुद्यावर १२ आठवड्यांत उत्तर सादर करू, अशी भूमिका मांडली होती. अधिवक्ता देशपांडे मांडलेली बाजू लक्षात घेता, सदर प्रकरण निकाली काढण्यात येत असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. त्यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही बाजू मांडली होती.आता जनहित याचिकेकडे लक्षकरवाढीच्या मुद्यावर काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलेली आहे. सदर याचिकेवर कधी सुनावणी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कक्ष अधिकाऱ्यांचे पत्रनागपूर खंडपीठाने भारिप-बहुजन महासंघाने दाखल केलेली याचिका निकाली काढल्यानंतर नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी ८ मार्च रोजी पत्र जारी केले. यामध्ये करवाढीच्या मुद्यावर विभागीय आयुक्त, अमरावती यांनी शासनाकडे दाखल केलेला तेरा पानांचा अहवाल स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात १५ मार्च रोजी पुन्हा पत्र जारी करून नागपूर हायकोर्टातील सरकारी विधिज्ञांना अवगत करून देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाHigh Courtउच्च न्यायालय