अकोला: राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून दर करार अद्याप प्राप्त झाले नसल्याने, जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी ताडपत्री व सौरकंदील वाटपाची योजना अडकली आहे. त्यामुळे या दोन्ही योजना मार्गी लागण्यासाठी दर करार केव्हा प्राप्त होतात, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत यावर्षी ३0 लाखांची ताडपत्री वाटप योजना आणि ३0 लाखांची सौरकंदील वाटप योजना राबविली जात आहे. या दोन्ही योजनेंतर्गत ९0 टक्के अनुदानावर जिल्ह्यातील शेतकर्यांना ताडपत्री आणि सौरकंदील वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन्ही योजनांना यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनें तर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांना ताडपत्री व सौरकंदिलाचे वाटप करण्यासाठी साहि त्य खरेदीकरिता दर करार उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राज्याच्या कृषी आयुक्तालयांकडे सादर करण्यात आला आहे; परंतु कृषी आयुक्तालयाकडून अद्याप दर करार प्राप्त झाले नाही. त्यामुळे दोन्ही योजनेंतर्गत ताडपत्री व सौरकंदील खरेदीसाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत अद्याप पुरवठा आदेश देण्यात आला नाही. दर करार प्राप्त झाल्यानंतर पुरवठा आदेश दिला जाणार आहे, आणि पुरवठा आदेशानंतर दोन्ही योजनांतर्गत शेतकर्यांना साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्या ताडपत्री व सौरकंदील वाटपाची योजना मार्गी लागण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून दर करार केव्हा प्राप्त होतात, याबाबतची प्रतीक्षा जिल्हा परिषद कृषी विभागाकडूनकेली जात आहे.
दर करारात अडकली ताडपत्री, सौरकंदील योजना
By admin | Updated: October 27, 2014 01:27 IST