शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम अजूनही अखर्चित

By admin | Updated: May 28, 2014 21:52 IST

पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मूर्तिजापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम संकल्पना आणली व पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे.देशाचा विकास साधायचा असेल तर प्रथम खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, या महात्मा गांधींच्या विचाराची कास धरून राज्य शासनाने खेड्यांच्या विकासासाठी व गावातील तंटे गावातच समेटाने मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम योजना कार्यान्वित केली. या योजनेचे सर्व निकष पूर्ण करणार्‍या गावांना राज्य शासनाकडून पुरस्कारही प्रदान करण्यात आले. त्यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील पारद गावाला वर्ष २०११-१२ चा तंटामुक्त ग्राम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारात मिळालेली रक्कम गावाच्या विकासावर खर्च करणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा निधी अखर्चितच आहे. तंटामुक्त ग्रामचा पुरस्कार तंटामुक्ती समितीला मिळत असला तरी तो निधी खर्च करण्याचा अधिकार संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीस देण्यात आला आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीला हा निधी खर्च करण्याचा मुहूर्त का सापडत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.