शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांमध्ये पोहोचले नाही टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:36 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३  दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत   ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी  पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ हैराण!६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत १३  दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र २0 ऑक्टोबरपर्यंत   ६१ पैकी ३४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला असून, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टँकरचे पाणी  पोहोचलेच नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा  कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला  नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील  काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे  या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा  योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.  या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई  बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त  ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर  रोजी दिला. १३ दिवसांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र  २0 सप्टेंबरपर्यंत ६१ पैकी ३४ गावांना २१ टँकरद्वारे  पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित पाणीटंचाईग्रस्त  २७ गावांमध्ये अद्याप टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची  िपण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.