मूर्तिजापूर/बोरगाव मंजू(जि. अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अनभोरा गावानजीकच्या वळणावर १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास टँकर व इंडिका कारची धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. या अ पघातात अन्य एकजण जखमी झाला. मूर्तिजापूरकडून बोरगाव मंजूकडे जाणारा एम.एच.0४ के. ६१८ क्रमांकाचा टँकर व एम.एच.३0 ए.ए. ३८७४ क्रमांकाच्या इंडिका कारची रविवारी सायंकाळी अनभोरा गावाजवळील वळणावर धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधून प्रवास करणारे अकोल्यातील रहिवासी मो. राजीक मो. याकुब (४0) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अकोल्यातीलच विशाल सुरेश निमोदी (४५) हे जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी सदर जखमीला मदत केले. तसेच मूर्तिजापूरचे ठाणेदार अबदागिरे, दुय्यम फौजदार ठाकरे, प्रजापती, पोलीस कर्मचारी ढोके यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघा तामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वृत्त लिहिपर्यंत या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीस चौकशी करीत आहेत.
टँकर-कारची धडक; एक ठार
By admin | Updated: December 14, 2015 02:44 IST