शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बालकलावंत सादर करणार प्रतिभावंतांचे बालसाहित्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST

अकोला : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ’’प्रतिभावंतांचे बालसाहित्य बालकांच्या ओठी'' हा कार्यक्रम आभासी ऑनलाइन पद्धतीने शनिवार, दि. ...

अकोला : मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ’’प्रतिभावंतांचे बालसाहित्य बालकांच्या ओठी'' हा कार्यक्रम आभासी ऑनलाइन पद्धतीने शनिवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेच्याकडून हा कार्यक्रम संध्याकाळी प्रसारित केला जाणार आहे.

या अपूर्व अशा कार्यक्रमात बालशिवाजी शाळा, कोठारी कॉन्व्हेंट, स्कूल ऑफ स्कालर्स (हिंगणा रोड), न्यू इंग्लिश हायस्कूल, आरडीजी पब्लिक स्कूलआणि प्रभात किड्स स्कूल या शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.त्यांनी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, गिरिजा कीर यांचे निवडक बालसाहित्य, कविता, बाल नाटिका, नाट्यछटा, कथाकथन अत्यंत सुंदररितीने सादर केले आहे.

बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी मंजिरी देशमुख, कांचन कवडे, वरदा बिडवई; न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी शेखर डांगे, यश बेलेकर, मधुरा परचुरे, अदिती तेलंग; कोठारी कॉन्व्हेंटची गार्गी व्यास, जिगीशा गर्गे, स्कूल ऑफ स्कालर्सच्या मधुरा कुलकर्णी, प्राची लाहोळकर, रिदवी अग्रवाल व श्रेया शेगोकार; आरडीजी पब्लिक स्कूलचा सोहन बोरकर, उत्तरा पुरकर आणि गौरी पूरकर; प्रभात किड्स स्कूलची कृष्णाई देशमुख, अंतरा गद्रे, अन्वी जायभाये आणि ईश्वरी पाटील यांनी मराठीतील विविध बालसाहित्य अत्यंत बहारदार पद्धतीने सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी स्निग्धा देशमुख हिने केले आहे.