शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना तलाठी जेरबंद

By admin | Updated: February 14, 2017 01:48 IST

आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठय़ाला रंगेहात पकडले.

वाशिम, दि. १३- शेती वाटणीची नोंद घेण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ फेब्रुवारी रोजी तलाठय़ाला त्याच्या राहत्या घरी रंगेहात पकडले. दीपक वसंतराव लहाने (४0) असे तलाठय़ाचे नाव असून, तो रिसोड तालुक्यातील आसेगावपेन येथे कार्यरत आहे.यासंदर्भात फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार व त्याच्या भावात शेतीची वाटणी झाली. शेती वाटणीची नोंद घेण्यासाठी दीड वर्षांपूर्वी आसेगावपेन येथील तलाठी दीपक लहाने यांना तक्रारदार भेटले असता, नोंद घेण्यासाठी तलाठय़ाने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तलाठय़ाला सहा हजार रुपये दिले होते. दरम्यानचे काळात तलाठी लहाने यांच्याशी तक्रारदार यांनी प्रत्यक्ष फोनद्वारे संपर्क साधून नोंदीबाबत पाठपुरावा केला. परंतु लहाने याने नोंद घेतली नाही. २२ जानेवारी २0१७ रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता नोंदी घेण्यासाठी उर्वरित ९ हजार रुपये द्यावे लागतील, असे तलाठय़ाने म्हटले. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. लहाने याने एकरी साडेतीन हजार रुपये याप्रमाणे तीन एकराचे साडेदहा हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्या-घेण्याचे ठरले. त्यानंतर लहाने यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांचे दत्तनगर लाखाळा वाशिम येथील राहते घरी पैसे देण्याचे ठरले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान दीपक लहाने (रा.तिवळी ता.मालेगाव) ह.मु. दत्तनगर वाशिम यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून स्वीकारलेली लाचेची रक्कम आठ हजार रुपये जप्त करण्यात आली. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधिक्षक विलास देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे यांच्या पथकाने केली.