शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी न आल्यास तूर विक्रीचे टोकन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:43 IST

अकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. 

ठळक मुद्दे१९ ऑगस्ट रोजी कृउबासमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहनउपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदी ३१ ऑगस्टपर्यंत केली जात आहे. त्याचवेळी टोकन घेतलेले अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर आलेले नाही. त्यामुळे टोकन घेतलेल्या सर्व शेतकर्‍यांनी १९ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद न केल्यास त्यांचे टोकन रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. बाजार समिती परिसर आणि घरी तूर पडून असलेल्या शेतकर्‍यांना विक्रीसाठी टोकन देण्यात आले आहे. त्या शेतकर्‍यांची तूर खरेदी सर्व केंद्रामध्ये सुरू आहे; मात्र काही केंद्रावर टोकन घेतलेले शेतकरी येत नसल्याचा प्रकार उघड होत आहे. त्यामुळे दैनंदिन नियोजन केल्याप्रमाणे खरेदी करणे शक्य नाही. शेतकरी केंद्रांवर येत नसल्यास त्यांनी तूर इतरत्र विक्री केली किंवा शासनाला देण्यास ते इच्छुक नाहीत. त्यातच ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदी पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे बाजार समितीमधून टोकन घेतलेले शेतकरी आहेत की नाहीत, घरी तूर असलेल्यांना विक्री करावयाची आहे की नाही, ही बाब पडताळून पाहिली जाणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना १९ ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये उपस्थित राहून नोंद करणे आवश्यक करण्यात आले. त्या दिवशी उपस्थित राहणार्‍या शेतकर्‍यांचा तूर खरेदी दिवस निश्‍चित करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आले. बाजार समितीमध्ये येताना शेतकर्‍यांनी सात-बारा, टोकन, पंचनाम्याची प्रत तसेच इतर आवश्यक कागदपत्रे आणण्याचे आवाहन करण्यात आले. त्या दिवशी बाजार समितीमध्ये नोंद न करणार्‍या शेतकर्‍यांचे विक्री टोकन रद्द केले जाणार आहे.